AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी ठरलोय आज सक्सेसफूल…’ अँडरसनचा रेकॉर्ड, इंग्लंडच्या एकाही खेळाडूला आतापर्यंत अशी कामगिरी जमली नव्हती!

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मोठी कामगिरी केलीय. त्याने इंग्लंडकडून आतापर्यंत सर्वाधिक टेस्ट मॅच खेळण्याचा विक्रम केलाय. अशी कामगिरी इंग्लंडच्या आणखी एकाही खेळाडूला जमली नव्हती. (James Anderson to play Most test mataches For England)

'मी ठरलोय आज सक्सेसफूल...' अँडरसनचा रेकॉर्ड, इंग्लंडच्या एकाही खेळाडूला आतापर्यंत अशी कामगिरी जमली नव्हती!
जेम्स अँडरसन
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jun 11, 2021 | 6:38 AM
Share

मुंबई : इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) मोठी कामगिरी केलीय. त्याने इंग्लंडकडून आतापर्यंत सर्वाधिक टेस्ट मॅच खेळण्याचा विक्रम केलाय. अशी कामगिरी इंग्लंडच्या आणखी एकाही खेळाडूला जमली नव्हती. इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलास्टर कूकचा (Alaster Cook) रेकॉर्ड मोडित काढत त्याने नवा विक्रम प्रस्थापित केलाय. इंग्लंडकडून सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत आता अँडरसन अव्वल स्थानी असेल. (James Anderson to play Most test mataches For England)

विक्रमवीर अँडरसन

अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इंग्लंडकडून सर्वाधिक म्हणजेच 162 सामने खेळले आहेत आणि आणखीही खेळतो आहे. गुरुवारपासून सुरु झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अँडरसनने मैदानात पाऊल ठेवताच हे यश मिळवलं. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून दुसर्‍या कसोटी सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपपूर्वी न्यूझीलंडचा इंग्लंडशी शेवटचा कसोटी सामना पार पडत आहे.

अँडरसनने कूकचा रेकॉर्ड तोडला

38 वर्षांच्या अँडरसनने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपले 162 सामने पूर्ण केले. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळल्यामुळे कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणारा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कूकचा विक्रम त्याने मोडित काढला. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. तो इंग्लंडकडून आतापर्यंत 147 कसोटी सामने खेळला आहे.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत अँडरसनची भूमिका महत्त्वाची

भारत सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तसंच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची महत्त्वाची भूमिका असणार आहे. इंग्लंडच्या वेगवान माऱ्याचं नेतृत्व अँडरसनच्या खांद्यावर असणार आहे. तसंच भारताच्या प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवण्याची जबाबदारी देखील अँडरसनच्या खांद्यावर असेल.

(James Anderson to play Most test mataches For England)

हे ही वाचा :

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद कोणाकडे?

WTC Final : भारतीय संघ मोठ्या पेचात, महत्वाच्या खेळाडूला बाहेर बसवण्याची शक्यता

Follow Us
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल