T20 वर्ल्ड कप टीममधून बाहेर गेल्यानंतर Jasprit Bumrah ची पहिली Reaction

| Updated on: Oct 04, 2022 | 12:56 PM

वर्ल्ड कपमध्ये खेळता येणार नाही, त्यावर काय म्हणाला जसप्रीत बुमराह?

T20 वर्ल्ड कप टीममधून बाहेर गेल्यानंतर Jasprit Bumrah ची पहिली Reaction
Jasprit Bumrah
Image Credit source: social
Follow us on

मुंबई: यंदाचा T20 वर्ल्ड कप (T20 World cup) ऑस्ट्रेलियात होणार आहे. या वर्ल्ड कप आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाहीय. स्ट्रेस फ्रॅक्चरच्या (Stress Fracture) दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपला मुकणार आहे. आता टीममध्ये त्याच्याजागी कोण खेळणार? हा प्रश्न आहे. दरम्यान या सगळ्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर जसप्रीत बुमराहकडून रिएक्शन आली आहे.

तो व्यक्तीगत दु:ख बाजूला ठेवून….

बुमराहच्या रिएक्शनवरुन त्याला झालेलं दु:ख स्पष्टपणे दिसून येतय. पण एक चांगली बाब ही आहे की, तो व्यक्तीगत दु:ख बाजूला ठेवून तो टीम इंडियाला सपोर्ट करणार आहे.

जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही, हे मागच्या आठवड्यात कळलं होतं. पण काल 3 ऑक्टोबरला त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं. बीसीसीआयने काल संध्याकाळी जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याचं जाहीर केलं.

बुमराहने टि्वटमध्ये काय म्हटलय?

“मी यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाहीय, याचं मला दु:ख आहे. ज्यांनी सतत मला प्रेम आणि पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे. आता रिकव्हरी दरम्यान ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये मी टीम इंडियाला सपोर्ट करीन” असं बुमराहने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

बुमराहची जागा कोण घेणार?

जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा उत्साह वाढवणार आहे. पण त्याची जागा कोण घेणार? हा प्रश्न आहे. बुमराह बाहेर गेल्यानंतर टीमसमोर हा मोठा प्रश्न आहे. आता बुमराहच्या जागी पर्याय म्हणून दीपक चाहर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी हे तीन पर्याय आहे. पण बुमराहच्या जागी कोण येणार? ते अजून स्पष्ट झालेलं नाही.