KKR vs MI Live Streaming : कोलकातासाठी निर्णायक सामना, मुंबई विरुद्ध भिडणार, मॅच किती वाजता?
Kolkata Knight Riders vs Mumbai Indians IPL 2026 Live Scorecard : कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर कोणत्याही स्थितीत मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे केकेआरसाठी हा सामना अतिशय निर्णायक ठरणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात 2 चॅम्पियन्स संघात आमनासामना होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात हा सामना होणार आहे. सूर्यकुमार यादव मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील 13 वा सामना असणार आहे. मुंबईचं या हंगामातून पॅकअप झालंय. तर केकेआरच्या प्लेऑफच्या आशा कायम आहत. त्यामुळे केकेआरसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कधी?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना बुधवारी 20 मे रोजी होणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना इडन्स गार्डन्समध्ये होणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल. तसेच https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकवरील लाईव्ह ब्लॉगद्वारे सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येतील.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
दरम्यान मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्स विरु्द्ध सरस राहिली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 36 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने या 36 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. मुंबईने केकेआर विरुद्ध 36 पैकी 25 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर केकेआरने मुंबईवर 11 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता बुधवारी होणार सामना कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.