AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket Pension : क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, या माजी खेळाडूंनाही पेन्शन, दर महिन्याला किती मिळणार?

Cricket Pension : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने राज्याचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या माजी महिला खेळाडूंना निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Cricket Pension : क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, या माजी खेळाडूंनाही पेन्शन, दर महिन्याला किती मिळणार?
Women Cricket TeamImage Credit source: Twitter
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 01, 2026 | 9:51 PM
Share

भारताता आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु असताना केएससीए अर्थात कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे. क्रिकेट बोर्डाने महिला क्रिकेटला प्रोत्साहान देण्यासाठी ऐतिहासिक पाऊस उचललं आहे. केएससीएने बुधवारी 1 एप्रिल रोजी कर्नाटक सीनिअर वुमन्स टीमचं नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या माजी खेळाडूंना दरमहा निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे माजी महिला खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. या माजी महिला खेळाडूंना क्रिकेट बोर्डाकडून पेन्शन म्हणून किती रक्कम मिळणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

पेन्शन मिळणार मात्र अटी काय?

केएससीएकडून सरसकट सर्वच माजी महिला खेळाडूंना पेन्शन मिळणार नाहीय. या पेन्शनसाठीही क्रिकेट बोर्डाच्या काही अटी आहेत. पेन्शनसाठी पात्र ठरणाऱ्या माजी खेळाडूंचं वय हे किमान 55 किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवं. तसेच बीसीसीआयकडून पेन्शन मिळत असल्यास संबंधित माजी महिला खेळाडूला केएससीएच्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच या माजी खेळाडूंना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी राज्य क्रिकेट संघाचं किती सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय? याची पुराव्यासह माहिती द्यावी लागेल.

पेन्शन देण्यामागील हेतू काय?

“राज्याचं प्रतिनिधित्व केलेल्या माजी खेळाडूंच्या कामगिरीची दखल आणि त्यांचं योग्य सन्मान हा या योजनेमागील हेतू असल्याचा केएससीएचे सचिव संतोष मेनन यांनी म्हटलं. तसेच हा निर्णय आजी महिला खेळाडूंना प्रोत्साहित करणारा आहे. कर्नाटकासाठी खेळलेल्या अनेक खेळाडूंनी आतापर्यंत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये सध्या श्रेयांका पाटील आणि राजेश्वरी गायकवाड यांचा समावेश आहे.

बीसीसीआयकडून महिला खेळाडूंना किती पेन्शन?

दरम्यान बीसीसीआय सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयकडून पुरुषांप्रमाणे माजी महिला क्रिकेटपटूंनाही पेन्शन देण्यात येते. माजी महिला क्रिकेटपटूने भारताचं किती सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय? यावर पेन्शनची रक्कम निश्चित होते. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

केएससीएचा मोठा निर्णय

बीसीसीआयकडून जून 2022 नंतर निवृत्त झालेल्या भारतीय महिला क्रिकेटपटूंना दरमहा 52 हजार 500 रुपये पेन्शन दिली जाते. तसेच फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेल्या आणि 2003 आधी निवृत्त झालेल्या खेळाडूंना दरमहा 45 हजार रुपये निवृत्ती वेतन दिलं जातं. तसेच भारताचं 25 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेल्या आणि 1993 आधी निवृत्त झालेल्या खेळाडूंना दर महिन्याला 70 हजार रुपये निवृत्ती वेतन दिलं जातं.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा