AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | केएल राहुलऐवजी ‘या’ खेळाडूने शिखरसोबत सलामीला यावे, भारताच्या माजी प्रशिक्षकाचा सल्ला

ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसरा टी 20 सामना 6 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे.

India vs Australia 2020 | केएल राहुलऐवजी 'या' खेळाडूने शिखरसोबत सलामीला यावे, भारताच्या माजी प्रशिक्षकाचा सल्ला
| Updated on: Dec 05, 2020 | 5:30 PM
Share

कॅनबेरा : टीम इंडियाने पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय (India vs Australia 2020) मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून केएल राहुल (K L Rahul) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan)सलामीला आले. केएलने सलामीला न येता पाचव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी यावे. तसेच शिखरसोबत सलामीला केएलऐवजी मयंक अगरवालने यावे, असा सल्ला टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी दिला आहे. mayank agarwal open the innings and k l rahul should bat at number five, said sanjay bangar

सलामीसाठी मयंक-शिखर सर्वोत्तम

“टी 20 मालिकेत सलामीला केएलऐवजी मयंक हा सर्वोत्तम पर्याय आहे. रोहित शर्माला दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत सलामीचा मोठा प्रश्न उपस्थित झाला. टीम इंडियाने सलामीसाठी धवनसह मयंकलाच पाठवायला हवे”, असं वक्तव्य संजय बांगर यांनी केलं. बांगर स्टार स्पोर्ट्ससोबत बोलत होते.

पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यात सलामी

मयंकने शिखरसोबत ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यात सलामी केली. या दोन्ही सामन्यात मयंकला अपेक्षित आणि चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. यामुळेच मयंकला तिसऱ्या एकदिवसीय आणि पहिल्या टी 20 सामन्यात संधी मिळाली नाही.

राहुलचं 5 व्या क्रमांकावर महत्वपूर्ण योगदान

“राहुलने 5 व्या क्रमांकावर बॅटिंग करताना टीम इंडियासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. राहुलने पाचव्या क्रमांकावरच फलंदाजसाठी यायला हवं”, असंही बांगर यांनी नमूद केलं.

सलामीला बॅटिंग करत पटकावली ऑरेंज कॅप

केएलने ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र त्याला या क्रमांकावर फार उठावदार फलंदाजी करता आली नाही. तर या विरोधात पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार अर्धशतक लगावलं. केएलने आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) सलामीला येत दमदार कामगिरी केली होती. सलामीला धमाकेदार फलंदाजी करत ऑरेंज कॅप पटकावली होती. आयपीएल स्पर्धेत एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते.

6 डिसेंबरला दुसरा टी 20 सामना

3 टी 20 सामन्यातील दुसरा सामना 6 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा दुसरा सामना ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’ चा असणार आहे. तर टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | बाऊन्सर खेळता येत नसेल तर बदली खेळाडू घेण्याचा हक्कही नाही, गावसकरांची जाडेजावर टीका

India vs Australia 2020 | टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू दुखापतग्रस्त, टी 20 मालिकेला मुकणार

mayank agarwal open the innings and k l rahul should bat at number five, said sanjay bangar

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.