India vs Australia 2020 | बाऊन्सर खेळता येत नसेल तर बदली खेळाडू घेण्याचा हक्कही नाही, गावसकरांची जाडेजावर टीका

पहिल्या टी 20 सामन्यात मिचेल स्टार्कने टाकलेला बाऊन्सर चेंडू जडेजाच्या हेल्मेटवर आदळला होता.

India vs Australia 2020 | बाऊन्सर खेळता येत नसेल तर बदली खेळाडू घेण्याचा हक्कही नाही, गावसकरांची जाडेजावर टीका
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 2:25 PM

कॅनबेरा : टीम इंडियाने पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia 1st t 20) टी 20 सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) या सामन्याचा हिरो ठरला. जडेजाने 23 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने तडाखेदार नाबाद 44 धावा केल्या. दरम्यान या विजयापेक्षा मुद्दा गाजला तो जडेजाच्या (Cuncussion Substitute)कन्कशन सब्सटिट्यूटचा. जाडेजा दुखापतग्रस्त झाल्याने त्याजागी फिरकीपटू युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली. दरम्यान या प्रकरणावरुन टीम इंडियाचे माजी खेळाडू लिटील मास्टर अर्थात सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जाडेजावर टीका केली आहे. तसेच विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. India vs Australia 2020 If you can’t play bouncer bowl, you have no right to replace him sunil Gavaskar criticizes ravindra Jadeja

गावसकर काय म्हणाले?

“मी जुन्या विचारांचा आहे. तुम्हाला फलंदाज म्हणून बाऊन्सर चेंडूचा सामना करता यायला हवा. जर बाऊन्सरचा सामना करता येत नसेल आणि तो चेंडू हेल्मेटवर आदळत असेल, तर तुम्हाला बदली खेळाडू घेण्याचाही हक्क नाही, अशी टीका गावसकर यांनी जडेजावर केली आहे. पण सर्व काही नियमांनुसार झालं आहे. त्यामुळे रवींद्र जडेजाच्या जागी युजवेंद्र चहल खेळण्यात काहीच हरकत नाही”, असंही गावसकर यांनी नमूद केलं. गावसकर ‘इंडिया टुडे’सोबत बोलत होते.

नक्की काय घडलं?

पहिल्या डावातील शेवटची ओव्हर मिचेल स्टार्क टाकत होता. स्टार्कने टाकलेला चेंडू बॅटिंग करत असलेल्या जाडेजाच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. यानंतरही जाडेजाने फलंदाजी केली. मात्र जडेजाला दुसऱ्या डावात फिल्डिंगसाठी येता आले नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यात जाडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला बदली खेळाडू (Cuncussion Substitute) म्हणून संधी देण्यात आली. चहलने या संधीचं सोनं केलं. त्याने टीम इंडियासाठी 3 विकेट्स घेत महत्वाची भूमिका बजावली.

जाडेजा टी 20 मालिकेबाहेर

बॅटिंगदरम्यान हेल्मेटला लागलेला चेंडू आणि उजव्या मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा टी 20 मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. जाडेजाला डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे या टी 20 मालिकेला मुकावे लागले आहे. जडेजाऐवजी संघात वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) संधी देण्यात आली आहे.

सामनाधिकाऱ्यांना आक्षेप नाही मग प्रशिक्षकांना का?

या पहिल्या सामन्यात जाडेजा दुखापतग्रस्त झाल्याने बदली खेळाडू म्हणऊन युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली. याबाबतचा निर्णय सामनाधिकाऱ्यांनी घेतला. मात्र या जडेजाऐवजी चहलला संधी देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आणि प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांना पचला नाही. यानंतर सामन्यागदरम्यान सामनाधिकारी आणि प्रशिक्षक लँगर यांच्यात वाद झालेला पाहायाला मिळाला. यावरुन गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सामनाधिकारी हे ऑस्ट्रेलियाचेच होते. त्यांना काहीच आक्षेप नव्हता. मग ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि प्रशिक्षक जस्टिन लॅंगर इतका गोंधळ का घालताहेत”, असा सवालही गावसकर यांनी उपस्थित केला.

दुसरा टी 20 सामना रविवारी

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्याच्यातील दुसरा टी 20 सामना रविवारी 6 डिसेंबरला सिडनीत खेळण्यात येणार आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. तर ऑस्ट्रेलियासाठी हा सामना ‘करो या मरो’चा असणार आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | पराभवासोबत ऑस्ट्रेलियाला दुहेरी दणका, दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू टी 20 सीरिजबाहेर

India vs Australia 2020 | टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू दुखापतग्रस्त, टी 20 मालिकेला मुकणार

India vs Australia 2020 | कांगारुंना दुहेरी झटका, दोन दिग्गज खेळाडू एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून बाहेर

India vs Australia 2020 If you can’t play bouncer bowl, you have no right to replace him sunil Gavaskar criticizes ravindra Jadeja

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.