MI vs KKR Live Streaming : मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यासाठी सज्ज, केकेआर विरुद्ध भिडणार, मॅच किती वाजता?

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2026 Live Scorecard : मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 मोहिमेतील आपल्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

MI vs KKR Live Streaming : मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यासाठी सज्ज, केकेआर विरुद्ध भिडणार, मॅच किती वाजता?
KKR vs MI IPL
Image Credit source: IPL Photo
| Updated on: Mar 29, 2026 | 1:29 AM

गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने सनरायजर्स हैदराबादवर आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने मात करत जबरदस्त विजय नोंदवला. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. हा दोन्ही संघांचा या हंगामातील पहिलाच सामना असणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे पलटणने विजयी सुरवात करावी, अशा आशा चाहत्यांना आहे. त्यामुळे पलटणच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कधी?

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना रविवारी 29 मार्चला होणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कुठे?

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला किता वाजता सुरुवात होणार?

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल. तर https://www.tv9marathi.com या वेबसाईटवर सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येतील.

मुंबई केकेआरपैकी कोण वरचढ?

मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात रविवारी 29 मार्चला होणारा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील 36 वा सामना असणार आहे. याआधी दोन्ही संघ एकूण 18 मोसमात 35 वेळा आमेनसामने आले आहेत. मुंबईने या 35 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबईने केकेआरचा 24 सामन्यांमध्ये धुव्वा उडवला आहे. तर केकेआरने सामन्यांमध्ये पलटवार करत मुंबईला पराभवाची धुळ चारली आहे.

तसेच उभयसंघातील वानखेडे स्टेडियममध्ये होणारा हा 13 वा सामना असणार आहे. मुंबईने आतापर्यंत 12 पैकी 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर कोलकातानाने पलटणला घरच्या मैदानात 2 वेळा पराभूत केलंय.

Follow Us