Vaibhav Suryawanshi : वैभव सूर्यवंशीवर होतोय अन्याय? भारतीय संघ कुठे माती खातोय, माजी क्रिकेटरने दाखवला आरसा!

एका खेळाडूला एक नियम आणि दुसऱ्या खेळाडूला दुसरा नियम असं करू नये. सर्वांना समान नियम असावेत, असा सल्लाही मोहोम्मद कैफने भारतीय संघाला दिला.

Vaibhav Suryawanshi : वैभव सूर्यवंशीवर होतोय अन्याय? भारतीय संघ कुठे माती खातोय, माजी क्रिकेटरने दाखवला आरसा!
vaibhav sooryavanshi and indian team
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2026 | 3:17 PM

Vaibhav Suryawanshi : भारत आणि न्यूझिलंड यांच्यात येत्या गुरुवारपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरु होत आहे. ही सिरीज जिंकण्यासाठी भारताने चांगलीच कंबर कसलीय. भारताच्या प्लेइंग 11 मध्ये सर्वोत्कृष्ट खेळांडूंचा समावेश होण्याची शक्यता आहे. परंतु या सिरीजमध्ये भारताचा सर्वात कमी वय असलेला धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी याला संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे सांगितले जातेय. वेस्ट इंडिजविरोधातील सिरीजमध्येही वैभवला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला सातत्याने बाहेर बसवले जात असल्याने आता भारताचा स्टार खेळाडू राहिलेल्या मोहम्मद कैफ याने भारतीय संघाचे कान टोचले आहेत. भारतीय संघ नेमकी कुठे चूक करतोय, याबाबत कैफने सांगितलंय.

वैभव सूर्यवंशीने जुलै 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास सुरुवात केली. वैभवने आतापर्यंत आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील तीन सामने हे इंग्लंड, तीन झिम्बॉम्बे आणि दोन सामने हे जपानविरोधात होते. दुसरीकडे संजू सॅमसन आणि अभिषेक शर्म सलामीचे फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. त्यामुळेच वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन मोहम्मद कैफने भारतीय संघाला महत्त्वाचा सल्ला दिलाय.

Loading...

मोहम्मद कैफने नेमका काय पर्याय सांगितला?

मोहम्मद कैफने क्रिकबझ या क्रीडाविषयक बातम्या देण्याऱ्या संस्थेशी बातचित केली. यावेळी वैभव सूर्यवंशीबाबत त्याने आपले मत व्यक्त केले. “तुम्हाला वैभव सूर्यवंशीला खेळायची संधी द्यायची नसेल तर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी संधी द्यावी. रणजी ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. तुम्ही वैभवला रणजीमध्येही खेळायला पाठवू शकता. यशस्वी जैस्वालसोबत असाच निर्णय घेतला गेला. वैभव सूर्यवंशीसोबत मात्र असे करण्यात आले नाही. एखादा खेळाडू आणखी चांगली कामगिरी तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याला खेळण्याची संधी मिळेल. टीमबाहेर बसवून ठेवल्यास खेळाडू चांगली कामगिरी करू शकत नाही,” असं परखड भाष्य कैफने केले.

तसेच एका खेळाडूला एक नियम आणि दुसऱ्या खेळाडूला दुसरा नियम असं करू नये. सर्वांना समान नियम असावेत, असा सल्लाही त्याने भारतीय संघाला दिला. दरम्यान, अशा प्रकारची मतं व्यक्त केली जात असताना वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us