AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6,6,6,6,6..! दिव्यांग हिंगणेकरने एकाच षटकात फोड फोड फोडला, पण…

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा थरार सुरु आहे. 31 वर्षीय दिव्यांग हिंगणेकरने महाराष्ट्र टी20 लीगमध्ये एका षटकात सलग 5 षटकार मारून वादळी खेळी केली. पण संघाला विजय मिळवता आला नाही.

6,6,6,6,6..! दिव्यांग हिंगणेकरने एकाच षटकात फोड फोड फोडला, पण...
दिव्यांग हिंगणेकर
| Updated on: Jun 07, 2025 | 8:57 PM
Share

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत रत्नागिरी जेट्स आणि कोल्हापूर टस्कर्स हे संघ आमनेसामने आले होते.महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 हंगामातील 5वा सामना या दोन्ही संघात पार पडला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर झालेल्या या सामन्यात रत्नागिरी जेट्सने 20 षटकात 7 गडी गमवून 173 धावा केल्या आणि विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं. या डावात रत्नागिरी जेट्सची स्थिती नाजूक होती. अवघ्या 4 धावांवर आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. पण चौथ्या विकेटसाठी दिव्यांग हिंगणेकर आणि कर्णधार अझिम काझी यांनी 91 धावांची भागीदारी केली. या भागीदारीत दिव्यांगचा सिंहाचा वाटा होता. त्याने फक्त 26 चेंडूत 58 धावा केल्या. विशेषतः, त्याने एका षटकात सलग 5 षटकार मारले. अथर्व डाकवेच्या 11 व्या षटकात पहिल्या 5 चेंडूत दिव्यांगने सलग 5 षटकार मारले. पण त्याच षटकात तो सहावा षटकार मारू शकला नाही, तरीही रत्नागिरीने त्या षटकात एकूण 32 धावा केल्या. पण सलग पाच षटकार मारूनही संघाला काही विजय मिळवता आला नाही. रत्नागिरी जेट्सला दिलेलं आव्हान काही रोखता आलं नाही.

दरम्यान, कोल्हापूर टस्कर्सने रत्नागिरी जेट्सने दिलेलं आव्हान 18.4 षटकात पूर्ण केलं. यावेळी बावने आणि त्रिपाठीने पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. त्रिपाठी बाद झाल्यानंतर बावनेने धससोबत 69 धावांची भागीदारी केली. या दोन भागीदारीमुळे कोल्हापूर टस्कर्सचा विजय सोपा झाला. बावनेने 46 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारत 51 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे कोल्हापूर टस्कर्सने 18.4 षटकात 3 गडी गमवून 174 धावा केल्या. कोल्हापूर टस्कर्सचा पोरे या सामन्यात सामनावीर ठरला. त्याने 4 षटकात 29 धावा देत 3 गडी बाद केले.

मागच्या पर्वात म्हणजेच महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 मध्ये दिव्यांग हिंगणेकर याच्याच षटकात ईगल नाशिक टायटन्सचा फलंदाज धनराज शिंदे याने सलग पाच षटकार मारले होते. त्यानंतर आता दिव्यांगनेही तशीच कामगिरी करून दाखवली आहे. महाराष्ट्राकडून तीनही स्वरूपात खेळणाऱ्या हिंगणेकरने आतापर्यंत 40 टी20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 297 धावा केल्या आहेत आणि 30 बळी घेतले आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?