AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs PAK, 1st ODI: न्यूझीलंडच्या फलंदाजाचा पदार्पणात धमाका, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, कृणाल पंड्याला झटका

Muhammad Abbas World record in Odi Debut : न्यूझीलंडच्या मुहम्मद अब्बास याने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं. मुहम्मदने या पदार्पणातील सामन्यातच वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

NZ vs PAK, 1st ODI: न्यूझीलंडच्या फलंदाजाचा पदार्पणात धमाका, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, कृणाल पंड्याला झटका
New Zealand Muhammad AbbasImage Credit source: blackcaps x account
| Updated on: Mar 29, 2025 | 5:14 PM
Share

न्यूझीलंडच्या मुहम्मद अब्बास याने पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या सामन्यातून एकदिवसीय पदार्पण केलं. मुहम्मदने पदार्पणातील सामन्यातच धमाका केला. मुहम्मदने पदार्पणात अर्धशतकी खेळी केली. मुहम्मदने पहिल्या डावात अवघ्या 24 चेंडत अर्धशतक झळकावत इतिहास घडवला. मु्हम्मद एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात वेगवान अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. मुहम्मदने यासह टीम इंडियाचा ऑलराउंडर कृणाल पंड्या याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. मुहम्मदने कृणालच्या तुलनेत 2 चेंडूआधी अर्धशतक पूर्ण केलं. कृणाल वनडे डेब्यूत 26 बॉलमध्ये फिफ्टी केली होती.

कृणाल पंड्याचा रेकॉर्ड ब्रेक

कृणाल पंड्या याने 2021 साली इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं होतं. आता मुहम्मदने 4 वर्षांनंतर कृणालचा हा विश्व विक्रम मोडीत काढण्यात यश मिळवलंय. मुहम्मदने पाकिस्तानविरुद्ध 26 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 52 रन्स केल्या. तसेच पदार्पणात वेगवान शतक करण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी टीम इंडियाच्या एकाचा समावेश आहे. ईशान किशन याने 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पणात 33 चेंडूत अर्धशतक केलं होतं. तसेच इंग्लंडचे माजी फलंदाज रोलँड बुचर यांनी 1980 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 35 बॉलमध्ये 50 धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडची विजयी सलामी

दरम्यान पाकिस्तानविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका 4-1 अशा फरकाने जिंकणाऱ्या न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेतही विजयी सुरुवात केली. न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 345 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानला 44.1 ओव्हरमध्ये 271 धावाच करता आल्या. न्यूझीलंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

मुहम्मद अब्बास याचा पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : निक केली, विल यंग, ​​हेन्री निकोल्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), मुहम्मद अब्बास, मिचेल हे (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, जेकब डफी आणि विल्यम ओरोर्क.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: अब्दुल्ला शफीक, उस्मान खान, बाबर आझम, मोहम्मद रिजवान (कर्णधार आणि विकेटकीपर), सलमान आघा, तैयब ताहिर, इरफान खान, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अली आणि अकिफ जावेद.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.