AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SA : दक्षिण आफ्रिकेचा सामन्यासह मालिका विजय, यजमान न्यूझीलंडचा 33 धावांनी धुव्वा

New Zealand vs South Africa 5th T20I Match Result : केशव महाराज याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने कमाल केली. दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि निर्णायक सामन्यात सामना जिंकून न्यूझीलंड विरुद्ध टी 20i मालिका आपल्या नावावर केली आहे.

NZ vs SA : दक्षिण आफ्रिकेचा सामन्यासह मालिका विजय, यजमान न्यूझीलंडचा 33 धावांनी धुव्वा
Keshav Maharaj NZ vs SA T20iImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 25, 2026 | 5:10 PM
Share

दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड विरुद्ध पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात बुधवारी 25 मार्चला 33 धावांच्या फरकाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा हा सलग दुसरा आणि एकूण तिसरा विजय ठरला. दक्षिण आफ्रिकेने यासह ही 5 सामन्यांची मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली. उभयसंघात चौथ्या सामन्यानंतर मालिका 2-2 ने बरोबरीत होती. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना जिंकून दोन्ही संघांना मालिका आपल्या नावावर करण्याची बरोबरीची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने मैदान मारलं. त्यामुळे यजमान न्यूझीलंडवर मायदेशात मालिका गमावण्याची वेळ ओढावली.

दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 187 धावा केल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंडला मालिका जिंकण्यासाठी 188 धावांची गरज होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 154 धावांपर्यंतच पोहचता आलं. न्यूझीलंडने अशाप्रकारे सामन्यासह मालिका गमावली.

सामन्यात काय झालं?

न्यूझीलंडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या 5 फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग केली. टॉनी डी झॉर्जी 12, वियान मुल्डर 31, रुबीन हरमन 39 आणि डियान फॉरेस्टर याने 21 धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कॉनर एस्टरहुइझेन याने सर्वाधिक आणि चाबूक खेळी केली.

एस्टरहुइझेन याने फक्त 33 बॉलमध्ये 227.27 च्या स्ट्राईक रेटने 75 रन्स केल्या. एस्टरहुइझेनने या खेळीत 6 सिक्स आणि 5 फोर लगावले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 187 धावांपर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडकडून बेन सियर्स याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.

न्यूझीलंडची बॅटिंग

न्यूझीलंडने विजयी धावांचा पाठलाग करताना पूर्ण ओव्हर खेळून काढल्या. न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगली सुरुवातही मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही त्या खेळीला मोठ्या आकड्यात बदलता आलं नाही. न्यूझीलंडसाठी बेवन जेकब्स याने सर्वाधिक 36 धावा केल्या. टीम रॉबिन्सन 25, कॅप्टन जेम्स निशाम 24 आणि डेन क्लीव्हर याने 22 धावांचं योगदान दिलं. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी गेराल्ड कोएत्झी, वियान मुल्डर आणि ओटनील बार्टमॅन याने तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर केशव महाराज याने 1 विकेट मिळवली.

कॉनर एस्टरहुइझेन मॅन ऑफ द सीरिज

दरम्यान कॉनर एस्टरहुइझेन हा मालिकावीर ठरला. कॉनरने या मालिकेत सर्वाधिक 200 धावा केल्या. तर डेव्हॉन कॉनव्हे या मालिकेत सर्वाधिक 100 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.  गेराल्ड कोएत्झी याने या मालिकेत सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. दक्षिण आफ्रिकेच्या गेराल्डने 5 सामन्यांमध्ये 8 विकेट्स मिळवल्या. तर न्यूझीलंडसाठी बेन सियर्स यानही 8 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला