AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZW vs SAW : न्यूझीलंडचा दमदार विजय, दक्षिण आफ्रिकेच्या महिला ब्रिगेडचा 6 विकेट्सने धुव्वा

New Zealand Women vs South Africa Women 3rd T20I Match Result : यजमान न्यूझीलंड वुमन्स क्रिकेट टीमने दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर जोरदार कमबॅक करत दमदार असा विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने तिसरा टी 20i सामना हा 6 विकेट्सने जिंकला आहे.

NZW vs SAW : न्यूझीलंडचा दमदार विजय, दक्षिण आफ्रिकेच्या महिला ब्रिगेडचा 6 विकेट्सने धुव्वा
New Zealand Women vs South Africa Women 3rd T20I MatchImage Credit source: ICC
| Updated on: Mar 21, 2026 | 3:21 AM
Share

न्यूझीलंड वुमन्स क्रिकेट टीमने तिसऱ्या टी 20i सामन्यात दक्षिण आफ्रिकने दमदार असा विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत आघाडी मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर 150 धावांचं सन्मानजनक आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान 8 बॉलआधी 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडने 18.4 ओव्हरमध्ये 152 धावा केल्या. न्यूझीलंडने अशाप्रकारे हा सामना जिंकला. न्यूझीलंडचा हा या मालिकेतील दुसरा विजय ठरला. न्यूझीलंडने यासह या मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे.

सोफी डीव्हाईन मॅन ऑफ द मॅच

न्यूझीलंडच्या विजयात बॅटिंग आणि बॉलिंगने दुहेरी योगदान देणारी सोफी डीव्हाईन मॅन ऑफ द पुरस्काराची मानकरी ठरली. सोफीने अर्धशतकासह 2 विकेट्स मिळवल्या.

सामन्यात काय झालं?

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. कॅप्टन लॉरा वॉर्लवॉर्ड्ट हीने बॅटिंगचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडीने निराशा केली. मात्र लॉरा आणि इतर तिघींनी दुहेरी आकडा गाठला. लॉराने टीमसाठी सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. कायला रेनेके हीने 24 धावा जोडल्या. तर इतर दोघींनीही योगदान दिलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून सन्मानजनक 149 धावांचा आकडा गाठता आला. न्यूझीलंडसाठी सुझी बेट्स आणि सोफी डीव्हाईन या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर इतर दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

न्यूझीलंडची बॅटिंग

न्यूझीलंडच्या ओपनिंग जोडीलाही काही खास करता आलं नाही. मात्र त्यानंतर कॅप्टन अमेलिया कीर, सोफी डीव्हाईन मॅडी ग्रीन या तिघींनी कमाल केली. या तिघींनी न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा केल्या. अमेलिया हीने 28 बॉलमध्ये 30 रन्स केल्या. त्यानंतर सोफी डीव्हाईन आणि मॅडी ग्रीन या जोडीनी धमाका केला. सोफी डीव्हाईन आणि मॅडी ग्रीन या दोघींनी पाचव्या विकेटसाठी 52 बॉलमध्ये नॉट आऊट 84 रन्सची पार्टनरशीप केली आणि न्यूझीलंडला विजयापर्यंत पोहचवलं.

सोफी डीव्हाईन हीने 38 बॉलमध्ये नॉट आऊट 55 रन्स केल्या. सोफीने या खेळीत 1 सिक्स आणि 6 फोर लगावले. तर मॅडीने 25 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह एकूण 34 धावांची नाबाद खेळी केली.

चौथा सामना कधी?

दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा क्रिकेट सामना हा रविवारी 22 मार्च रोजी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा सामना जिंकून मालिकेत बरोबरीत करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर न्यूझीलंडकडे सामन्यासह मालिका नावावर करण्याची दुहेरी संधी आहे.

Follow Us
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजे
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता...
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!
निधी मिळत नाही कारण...निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण...तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगित
Vidhan Parishad | नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगितलंच
दार उघडलं आणि सर्वजण हादरले'; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?
दार उघडलं आणि सर्वजण हादरले; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?
मी लागतो नादाल चल, दाखव काय..., राऊतांचं संजय पाटलांना थेट आव्हान
मी लागतो नादाल चल, दाखव काय..., राऊतांचं संजय पाटलांना थेट आव्हान
ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार
ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच...
येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; नेत्याच्या मुलाची पोस्ट व्हायरल
उमरग्यात येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल
षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
Eknath Shinde | षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...
Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!