
नवी दिल्ली : यंदाचा वनडे वर्ल्ड कप भारतात होतोय. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना उत्सुक्ता असते, ती भारत-पाकिस्तान सामन्याची. यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. मागच्या महिन्यात वर्ल्ड कपच शेड्युल जाहीर झालं. भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरलीय. 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच ठरली आहे.
पण आता भारत-पाकिस्तान सामन्याबाबत महत्वाची अपेडट आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलू शकते. हा सामना पुन्हा रिशेड्यूल केला जाऊ शकतो.
भारत विरुद्ध पाक सामन्याची तारीख का बदलणार?
तुम्ही म्हणत असाल, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख का बदलणार?. भारत-पाकिस्तान सामना ज्या दिवशी होणार आहे, त्याच दिवसापासून नवरात्रीचा उत्सव सुरु होत आहे. नवरात्री हा गुजरातमधला मोठा सण आहे. नवरात्रीत संपूर्ण गुजरातमध्ये गरब्याची धूम असते. भारत-पाकिस्तान सामन्याचा वेन्यू अहमदाबाद आहे. इथे गरबाप्रेमींची संख्या कमी नाहीय. ICC ने यावर BCCI ला विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
कोणाला बसणार फटका?
भारत-पाकिस्तान सामना रिशेड्यूल झाला, तर तारीख बदलू शकते. आधीपासून तिकीट विकत घेणाऱ्या क्रिकेटप्रेमींच यामुळे नुकसान होईल. तारीख बदलण्याआधी हाय वोल्टेज सामन्याच्या TRP कडे डोळे लावून बसलेल्या ब्रॉडकास्टर समोर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
BCCI लवकरच निर्णय घेणार
BCCI वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना यावर विचार सुरु असल्याच सांगितलं. लवकरच या बद्दल निर्णय होईल. नवरात्री दरम्यान सुरक्षा यंत्रणांनी भारत-पाकिस्तान सारख्या हाय-प्रोफाइल सामन्याच आयोजन टाळण्याचा सल्ला दिला आहे.
अहमदाबादमध्ये किती सामने होणार?
BCCI ने मागच्या महिन्यात वर्ल्ड कप शेड्यूल जारी केलं होतं. शेड्युलनुसार हा सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे. 1 लाख प्रेक्षक क्षमता असलेल्या मोदी स्टेडियममध्ये ही मॅच होणार आहे. या सामन्याशिवाय मोदी स्टेडियममध्ये आणखी 3 सामने होणार आहे. यात न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि वर्ल्ड कपची फायनल येथे होणार आहे. वर्ल्ड कपच आयोजन 10 शहरात होणार आहे.
27 जुलैच्या मीटिंगमध्ये होणार फैसला?
BCCI सेक्रेटरी जय शाह यांनी वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांच आयोजन करणाऱ्या सर्व क्रिकेट असोसिएशन्सा पत्र लिहून 27 जुलैला मीटिंगसाठी दिल्लीला बोलावल आहे. यावेळी भारत-पाकिस्तान सामन्याबाबत चर्चा होऊ शकते. त्यामुळे नव्या तारखेची घोषणा होऊ शकते.