AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs AUS 3rd Odi : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम सामना, कोण जिंकणार मालिका?

Pakistan vs Australia 3rd ODI : पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा 4 जून रोजी निकाल लागणार आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

PAK vs AUS 3rd Odi : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम सामना, कोण जिंकणार मालिका?
Pakistan vs AustraliaImage Credit source: Australian Mens Cricket Team Facebook Page
| Updated on: Jun 03, 2026 | 11:43 PM
Share

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Of Pakistan) आहे. ऑस्ट्रेलिया आणि यजमान पाकिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील मालिका 2 सामन्यांनंतर 1-1 ने बरोबरीत आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी सलामी देत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. त्यामुळे पाकिस्तानकडे सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी होती. मात्र पाहुण्या ऑस्ट्रेलियाने करो या मरो सामन्यात पाकिस्तानला लोळवलं आणि मालिकेत विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यासह दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची बरोबरीची संधी आहे. अशात आता पाकिस्तान यशस्वी ठरणार की ऑस्ट्रेलिया ट्रॉफीसह मायदेशी परतणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाकिस्ताने 30 मे रोजी ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक केलं. कांगारुंनी मंगळवारी 2 जून रोजी पाकिस्तानचा 41 धावांनी धुव्वा उडवला. आता तिसरा सामना हा गुरुवारी होणार आहे. जोश इंग्लिस याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर शाहीन शाह पाकिस्तानचं कर्णधारपद सांभाळत आहे. अशात आता तिसऱ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना कधी?

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना गुरुवारी 4 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना कुठे?

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम सामना टीव्हीवर भारतात दाखवण्यात येणार नाही.

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम सामना मोबाईलवर निवडक एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...