Pak vs NZ 1st ODI : अखेर पाकिस्तानने 103 दिवसानंतर वनडेमध्ये मिळवला कडक विजय, फखर जमांच तुफानी शतक

Pakistan vs New Zealand : वनडेमध्ये पाकिस्तानचा हा 500 वा विजय आहे. पाच वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये पाकिस्तानने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. फखर जमांची सेंच्युरी या सामन्याच वैशिष्ट्य ठरलं.

Pak vs NZ 1st ODI : अखेर पाकिस्तानने 103 दिवसानंतर वनडेमध्ये मिळवला कडक विजय, फखर जमांच तुफानी शतक
pak vs nz 1st odi
Image Credit source: twitter
| Updated on: Apr 28, 2023 | 9:27 AM

रावळपिंडी : फखर जमांच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने 103 दिवसानंतर वनडे क्रिकेटमध्ये पहिला विजय मिळवलायय. न्यूझीलंड विरुद्ध रावळपिंडीमध्ये ही मॅच झाली. पाकिस्तानने हा सामना 5 विकेटने जिंकला. पाकिस्तानची टीम 103 दिवसानंतर वनडे मॅच खेळली, त्यात त्यांनी विजय मिळवला. मागचा वनडे सामना पाकिस्तानने जानेवारी महिन्यातच न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. पाकिस्तानचा वनडे क्रिकेटमध्ये हा 500 वा विजय आहे.

बाबर आजमच्या टीमने 5 मॅचच्या सीरीजमध्ये 1-0 आघाडी घेतली आहे. न्यूझीलंड टीमने पहिली बॅटिंग केली. डॅरेल मिचेलची सेंच्युरी आणि विल यंगच्या हाफ सेंच्युरीच्या बळावर न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 288 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून दोघांचा दमदार खेळ

मिचेलने 115 चेंडूत 11 चौकार आणि एक षटकार ठोकून 113 धावा केल्या. यंग 78 चेंडूत 86 धावांची इनिंग खेळला. त्याने 8 फोर आणि 2 सिक्स मारले.

पाकिस्तानची दमदार सुरुवात

यंग आणि मिचेल सोडल्यास न्यूझीलंडकडून अन्य कुठला फलंदाज विशेष चालला नाही. शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. शादाब खानने एक विकेट घेतला. 289 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने दमदार सुरुवात केली. फखर जमां आणि इमाम उल हकमध्ये 124 धावांची भागीदारी झाली. इमामने 60 धावा केल्या.


बाबरच अर्धशतक हुकलं

ओपनर इमाम पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर बाबर आजमने 49 धावा करुन फखरला साथ दिली. पाकिस्तानला 214 धावांवर बाबरच्या रुपात दुसरा धक्का बसला. शान मसूदची बॅट विशेष चालली नाही. तो 1 रन्सवर बाद झाला. टीमला विजयाच्या जवळ पोहोचवून फखर 43 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. फखरने 114 चेंडूत 117 धावा केल्या.

रिजवानची शानदार इनिंग

255 रन्सवर पाकिस्तानच्या चार विकेट गेल्यानंतर मोहम्मद रिजवानने जबाबदारी संभाळली. या दरम्यान सलमान सुद्धा बाद झाला. रिजवानने एकबाजू लावून धरली. त्याने टीमला विजय मिळवून दिला. रिजवानने 34 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या.