पाकिस्तानच्या क्रिकेट संघात 3 खेळाडू कोरोनाबाधित, क्रिकेट बोर्डाने दिली माहिती

| Updated on: Oct 28, 2021 | 4:09 PM

कोरोनाचं संकट अजूनही गेलं नसल्याचं अनेक वृत्त्तातून समोर येत असतं. आताही पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने त्यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.

1 / 5
एकीकडे पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघ टी20 विश्वचषकात दमदार कामगिरी करत आहे. दोन्ही सलामीचे सामने जिंकत गुणतालिकेत पहिलं स्थान संघाने मिळवलं आहे. पण महिला टीममधून मात्र एक वाईट बातमी समोर आली आहे. 3 महिला क्रिकेटर्सना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गुरुवारी (28 ऑक्टोबर) याबाबतची माहिती दिली.

2 / 5
पाकिस्तान महिला टीम वेस्टइंडीज संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठीच कराचीच्या हनीफ मोहम्मद हाय परफॉर्मेंस सेंटरमध्ये संघाचा सराव कॅम्प लागला होता. यावेळीच बुधवारी कोरोना चाचणी करण्यात आली ज्यामध्ये 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

3 / 5
नेमक्या कोणत्या पाकिस्तानी खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. पण या तिघीचंही संपूर्ण विलगीकरण झाल्याचं समोर आलं आहे. तसचं सध्यातरी त्यांना 2 नोव्हेंबरपर्यंत विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांनी वेळोवेळी कोरोना चाचणी केली जाणार आहे.

4 / 5
वेस्ट इंडिजचा महिला संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजच्या महिला संघामध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका सुरु होणार होती. यातील पहिला सामना 8 नोव्हेंबर रोजी, तर दुसरा 11 नोव्हेंबर आणि शेवटचा 14 नोव्हेंबर रोजी पार पडणार होता.

5 / 5
याच वर्षी पाकिस्तानचा महिला संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यामध्ये तीन टी20 आणि 5 वनडे सामने खेळला होता. त्याचदरम्यान वेस्टइंडीज क्रिकेटच्या सीईओंनी वेस्ट इंडिजही पाकचा दौरा करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.