
Rinku Rajguru And Priya Saroj Video : सोशल मीडियाचं जग फारच वेगळं आहे. इथे कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. नुकताच टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर भारतीय संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सामना चालू असताना तसेच सामना झाल्यानंतर लोकांनी या खेळाडूंचे अनेक खास क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत. त्यांचे हेच व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा सदस्य असलेल्या रिंकू सिंह आणि त्याची पत्नी खासदार प्रिया सरोज यांचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू सिंह चक्क आपल्या पत्नीला विसरला आहे.
हा व्हिडीओ एका विमानतळावरील असल्याचे दिसत आहे. मात्र तो नेमका कुठला आहे, हे समजू शकले नाही. या व्हिडीओत रिंकू आणि प्रिया सरोज हे दोघेही दिसत आहेत. रिंकू सिंहच्या कानात हेडफोन आहेत. तर प्रिया सरोजच्या डोक्यावर काळ्या रंगाचा गॉगल दिसतोय. प्रिया सरोजच्या एका हातात मोबाईल फोन आहे. तर दुसऱ्या हातात पर्स आहे. रिंकू सिंहच्या खांद्यावर त्याची बॅग दिसत आहे. दोघेही कुठेतरी चालत जात आहेत. परंतु याच वेळी रिंकू सिंहने एक चूक केली आहे.
रिंकू सिंह चालत असताना आपली पत्नी प्रिया सरोजला विसरून गेला आहे. तिला मागे सोडून रिंकू वेगात चालत आहे. हे सगळे पाहून प्रिया सरोज थोडी नाराज झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. ‘अरे मला विसरून गेला आहेस का?’ असे प्रिया सरोज त्याला विचारत असल्याचे दिसत आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर रिंकूने प्रिया सरोज यांच्या खांद्यावर हात टाकला आहे. त्यानंतर दोघेही सोबत चालत आहेत.
Rinku Singh Forgot his wife is also with him
Her wife Instantly said Did you forget me
Rinku being Rinku 😭 pic.twitter.com/K844saP1lY— Gagan Choudhary (@choudhary_99415) March 10, 2026
दरम्यान, एक्स या समाजमाध्यमावर @choudhary_99415 या खात्यावर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला आहे. नोटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. रिंकू आणि प्रिया सरोज यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.