AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babar Azam चा कारनामा, ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, विराटला पछाडलं, नक्की काय केलं?

Babar Azam World Record : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बाबरने एका खेळीसह ख्रिस गेल, विराट कोहली यासारख्या फलंदाजांना मागे टाकलं आहे. बाबरने वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

Babar Azam चा कारनामा, ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, विराटला पछाडलं, नक्की काय केलं?
Babar Azam Fastest 12 Thousand T20 RunsImage Credit source: PTI
| Updated on: Apr 09, 2026 | 10:35 PM
Share

जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत टी 20I लीग स्पर्धा अर्थात आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. या 19 व्या मोसमात गुरुवार 9 एप्रिल पर्यंत प्रत्येक संघाने किमान 2 सामने खेळले आहेत. या स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेदरम्यान पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बाबरने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बाबरने नक्की काय केलं? हे सविस्तर समजून घेऊयात.

पेशावर जाल्मीने पीएसएल 2026 च्या 17 व्या सामन्यात कराची किंग्स विरुद्ध द्विशतक झळकावलं. बाबरच्या संघाला टॉस गमावून बॅटिंगसाठी भाग पाडण्यात आलं. मात्र बाबरच्या टीमने या संधीचा फायदा घेत 200 पार मजल मारली. बाबरच्या नेतृत्वात पेशावर जाल्मीने 20 षटकांत 3 विकेट्स गमावून 246 रन्स केल्या. बाबरने पेशावर जाल्मीसाठी 51 चेंडूत नाबाद 87 धावा केल्या. बाबरने या खेळीत 2 षटकार आणि 10 चौकार लगावले. बाबरने यासह टी 20 कारकीर्दीत 12 हजार धावांचा टप्पा गाठला. बाबर टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान 12 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. बाबरने 343 डावांत 12 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आणि ख्रिस गेल याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

बाबरने ख्रिस गेल याच्या तुलनेत 5 डावांआधी 12 हजार टी 20 धावा पूर्ण केल्या. गेलने 343 डावांत 12 हजार धावांचा टप्पा गाठला होता. वेगवान 12 हजार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा माजी फलंदाज विराट कोहली तिसऱ्या स्थानी आहे. विराटने 360 डावांत 12 हजार धावा केल्या होत्या.

टी 20 क्रिकेट आणि वेगवान 12 हजार धावा करणारे फलंदाज

बाबर आझम : 338 डाव

ख्रिस गेल : 343 डाव

विराट कोहली : 360 डाव

डेव्हीड वॉर्नर : 368 डाव

जोस बटलर : 405 डाव

कुसल मेंडीसचा शतकी तडाखा

दरम्यान पेशावर जाल्मीसाठी कुसल मेंडीस याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. कुसलने शतक झळकावलं. कुसलने तिसऱ्या स्थानी येत ही कामगिरी केली. कुसलने 52 चेंडूत एकूण 109 धावा केल्या. कुसलने या दरम्यान 14 चौकार आणि 4 षटकार लगावले. तसेच अब्दुल समद याने फिनिशिंग टच दिला. अब्दुलने 12 बॉलमध्ये 40 रन्स केल्या. अब्दुलने या नाबाद खेळीत 4 षटकार आणि 3 चौकार लगावले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...