AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: क्विंटन डीकॉकचा माफीनामा, पुढच्या सामन्यात गुडघ्यावर बसण्यास तयार

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. कॅरेबियन संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने गुडघे टेकण्यास नकार दिला होता.

T20 World Cup 2021: क्विंटन डीकॉकचा माफीनामा, पुढच्या सामन्यात गुडघ्यावर बसण्यास तयार
Quinton de Kock
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 28, 2021 | 1:41 PM
Share

दुबई : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. कॅरेबियन संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने गुडघे टेकण्यास नकार दिला होता. यामुळे त्याने सामना सुरू होण्यापूर्वीच प्लेइंग इलेव्हनमधून आपले नाव मागे घेतले. पण, आता डीकॉकला आपल्या कृत्याची लाज वाटत असून, त्याने सहकारी खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांची माफीही मागितली आहे. (Quinton de Kock apologises, will take the knee, Black Lives Matter)

खरं तर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने प्रत्येक सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंना गुडघे टेकावे लागतील, अशा सूचना दिल्या होत्या. क्विंटन डी कॉकने त्याच्या क्रिकेट बोर्डाच्या या सूचनेचे पालन करण्यास नकार दिला आणि सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. पण, आता त्याने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली असून, क्रिकेट बोर्डासमोर गुडघे टेकले आहेत. खेळाडूंनी गुडघे टेकल्याने जागरुकता पसरत असेल, आणि कृष्णवर्णीयांचं आयुष्य अधिक चांगलं होत असेल तर त्याने मला आनंदच होईल, असे डीकॉकने म्हटले आहे.

डीकॉकचा माफीनामा

डीकॉकने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डामार्फत जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “मला माझे संघ सहकारी आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट चाहत्यांची माफी मागायची आहे. मला तो मुद्दा बनवायचा नव्हता. माझ्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि या देशासाठी क्रिकेट खेळण्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. मला माझ्या देशासाठी पुन्हा क्रिकेट खेळायचे आहे. मला विश्वचषक जिंकायचा आहे. एक खेळाडू म्हणून मला माझी जबाबदारी माहीत आहे. रेसिज्मच्या विरोधात उभे राहणे काय असते हे देखील मला माहीत आहे. माझ्या गुडघ्यावर बसण्याने लोक शिक्षित होत असतील तर मला यापेक्षा जास्त आनंद होणार नाही.

आंतरराष्ट्रीय करिअरवरील धोका टळला

यापूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, डीकॉकने गुडघ्यावर बसण्यास नकार दिल्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले होते. तसेच क्रिकेट बोर्ड मोठ्या कारवाईच्या तयारीत होतं, ज्यामुळे डीकॉकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ग्रहण लागू शकते. पण आता डावखुऱ्या यष्टिरक्षक फलंदाजाच्या माफीनंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवरील धोका टळला आहे. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना डेकॉकशिवायही जिंकला. आता सुपर 12 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ डीकॉकसह मैदानात उतरताना पाहायला मिळेल.

इतर बातम्या

India vs New zealand: झहीर खानचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला, सांगितली न्यूझीलंड संघाची खरी ताकद

India vs New zealand: खुशखबर! हार्दीकने सुरु केली गोलंदाजी, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज

VIDEO: एबी डिव्हिलियर्सप्रमाणे शॉट खेळायला गेला आणि बाद झाला, बांग्लादेशच्या खेळाडूची ही विकेट पाहाच!

(Quinton de Kock apologises, will take the knee, Black Lives Matter)

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं