रियान परागचा भलताच तोरा! सेल्फी काढायला आलेल्या मुलाला उद्धटपणे नाकारलं Video

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफचं स्थान डळमळीत झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना गमावल्याने करो या मरोची स्थिती आहे. असं असताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग भलत्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रियान परागचा भलताच तोरा! सेल्फी काढायला आलेल्या मुलाला उद्धटपणे नाकारलं Video
रियान परागचा भलताच तोरा! सेल्फी काढायला आलेल्या मुलाला उद्धटपणे नाकारलं Video
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 18, 2026 | 8:24 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार या ना त्या कारणाने चर्चेत आला आहे. सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये वेपिंग करताना चित्रित झाला होता. त्यामुळे वादाला फोडणी मिळाली होती. बीसीसीआयने कारवाई म्हणून त्याच्या सामना फीमधून 25 टक्के रक्कम कापली. तसेच एक डीमेरिट पॉइंट दिला. आता रियान पराग पुन्हा एकदा चर्चा आला आहे. यावेळी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात सेल्फी काढण्यासाठी एका लहान मुलाला उद्धटपणे बाजूला करताना दिसत आहे. रियान परागची लहानग्यासोबतची वागणूक क्रीडाप्रेमी आणि नेटकऱ्यांना जराही आवडलेली नाही. एक लहान मुलगा निरागसपणे रियान परागकडे सेल्फी आणि ऑटोग्राफ मागताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने सुरूवातीला नकार दिला. पण त्याने पुन्हा प्रयत्न करत त्याच्या बाजूने चालू लागला. तेव्हा त्याने त्याला पकडून बाजूला ढकललं आणि पुढे निघून गेला. व्हायरल झालेल्या क्लिपनुसार रियान पराग कडेकोट सुरक्षेत प्रवास करत होता.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागची या कृतीने नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. एका युजर्सने राजस्थान रॉयल्सला टॅग करत लिहिलं की, रियानला पुढच्या पर्वात कर्णधार म्हणून पाहू इच्छित नाहीत. त्याला कर्णधारपदावरून काढलं पाहीजे. एक सेलिब्रिटी आणि आदर्श व्यक्ती म्हणून परागने त्या मुलाशी अधिक प्रेम आणि संवेदनशीलतेने वागायला हवे होते, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. या प्रकारामुळे युजर्स आपल्या तीव्र भावना व्यक्त करत आहेत.

रियान परागची या स्पर्धेत कामगिरी सरासरी राहिली आहे. त्याने 11 सामन्यातील 11 डावात फलंदाजी करताना 25.80 च्या सरासरीने आणि 151.76 च्या स्ट्राईक रेटने 258 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने दोन अर्धशतकं ठोकली आहेत. यात 90 ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफ शर्यतीतून बाद होण्याची शक्यता आहे. 12 सामन्यात 6 विजयासह 12 गुण मिळवले आहेत. आता 16 गुणांचं गणित सोडवायचं तर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे.

Follow Us