AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: …तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग असं का म्हणाला?

आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात टॉपला असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाची स्थिती नाजूक आहे. आता आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळेल की नाही अशी स्थिती झाली आहे. असं असताना कर्णधार रियान परागने आपला संताप व्यक्त केला आहे.

IPL 2026: ...तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग असं का म्हणाला?
IPL 2026: ...तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग असं का म्हणाला?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 18, 2026 | 6:19 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 62व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न लांबलं आहे. इतकंच काय तर प्लेऑफमध्ये स्थान मिळेल की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात राजस्थान रॉयल्सला काहीही करून जिंकावंच लागणार आहे. म्हणजेच राजस्थान रॉयल्सची करो या मरोची स्थिती आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने संताप व्यक्त केला आहे. रियान पराग सामन्यानंतर म्हणाला की, जर असंच खेळत राहिलो तर प्लेऑफ गाठू शकणार नाही.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर रियान पराग म्हणाला की, ‘मला वाटते की जर आपल्याला ट्रॉफी जिंकायची असेल तर आपल्याला अधिक चांगला खेळ करावा लागेल. मी खूप निराश आहे. मला वाटते की गेल्या चार-पाच सामन्यांमध्ये आम्ही जसा खेळ दाखवला आहे, त्यापेक्षा आमचा संघ खूपच चांगला आहे. मात्र, विश्रांतीनंतर परत आल्यावर, मला जाणवते की आज आम्ही जी ऊर्जा, कौशल्य आणि अंमलबजावणी दाखवली, ती पूर्वीसारखी राहिलेली नाही. जर आम्ही असाच खेळत राहिलो, तर आम्ही अव्वल चार संघांच्या शर्यतीत राहणार नाही.’

दरम्यान, 18 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज असताना, अनुभवी दासुन शनाकाच्या ऐवजी अर्धवेळ ऑफ-स्पिनर डोनोव्हन फरेराला गोलंदाजी देण्याच्या निर्णयाचे परागने समर्थन केले. क्रीजवर दोन डावखुरे फलंदाज असल्याने हा धोका पत्करणे आवश्यक होते, असं पराग म्हणाला. रियान पराग म्हणाला की, ‘हा काही जुगार नव्हता. मला माहित आहे की टीव्हीवर हे जुगारासारखं दिसतं, पण त्यावेळी क्रीजवर दोन डावखुरे फलंदाज होते. शनाकाला आणखी एक षटक टाकण्याऐवजी मी डोनोव्हान फरेराला गोलंदाजी देऊन एक संधी घेणे पसंत केले असते.’

राजस्थान रॉयल्सने 14 षटकांच्या अखेरीस 3 गडी गमावून 161 धावा केल्या होत्या आणि मजबूत स्थितीत होते. पण 26 चेंडूंमध्ये 51 धावा करणाऱ्या रायन परागच्या विकेटनंतर खालच्या फळीतील फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. संघाने शेवटच्या 7 षटकांत केवळ 41 धावा केल्या आणि 6 गडी गमावले. 220-230 धावांचे लक्ष्य ठेवेल असं वाटत असताना राजस्थान रॉयल्सचा संघ अचानक कोसळला आणि अवघ्या 193 धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...