Video : रिंकु सिंहला झिम्बाब्वे दौऱ्यात मिळालं बक्षीस; सर्व खेळाडूंनी केली अशी मागणी

रिंकु सिंहने झिम्बाब्वे दौऱ्यात आपली छाप सोडली. पहिल्या सामन्यात खातं खोलू शकला नाही. पण त्यानंतर त्याने जबरदस्त कमबॅक केलं. तसेच डेथ ओव्हरमध्ये फटकेबाजीची कमाल केली. दरम्यान, रिंकु सिंहला याला एक खास बक्षीस मिळालं. तेव्हा इतर खेळाडूंनी त्याच्याकडे विनंती करत केली अशी मागणी..

Video : रिंकु सिंहला झिम्बाब्वे दौऱ्यात मिळालं बक्षीस; सर्व खेळाडूंनी केली अशी मागणी
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 15, 2024 | 4:23 PM

भारताने झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका 4-1 ने जिंकली. या मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. पाचव्या टी20 सामन्यात रिंकु सिंहची जादू दिसून आली. यावेळी रिंकु सिंहला एका खास बक्षिसाने गौरविण्यात आलं. राहुल द्रविडच्या कार्यकाळात सुरु झालेली फिल्डिंग मेडलची योजना आता सुरुच आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणने यात कोणताही बदल केलेला नाही. रिंकु सिंहने हरारेमध्ये जबरदस्त फिल्डिंग केली होती. रिंकु सिंहला फक्त एका सामन्यासाठी नाही तर संपूर्ण मालिकेत केलेल्या फिल्डिंगसाठी गौरविण्यात आलं. रिंकु सिंहला हे मेडल प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मणच्या हातून मिळालं. यानंतर रिंकु सिंहने छोटं पण जबरदस्त भाषण दिलं. त्याच्या भाषणाने इतर खेळाडूंची मनं जिंकली. 5 फूट 5 इंचाच्या रिंकु सिंहने हे भाषण टेबलवर उभ राहून केलं. इतर खेळाडूंनी टेबलवर उभं राहून भाषण करण्यास सांगितलं. तेव्हा रिंकुने त्यांचं ऐकलं आणि स्पीच दिलं.

रिंकुने सिंहने सांगितलं की, “मला सर्वांसोबत एकत्र खेळताना मजा आली. ही माझी चौथी किंवा पाचवी मालिका आहे. मी या मालिकेचा खूप सारा आनंद घेतला. खरं सांगायचं तर मला फलंदाजी आणि फिल्डिंग खूप जास्त आवडते. मी याचा आनंद लुटतो. हे खूप मजेशीर आहे. धावताना एक वेगळीच मजा येते. तर मी याबाबत अजून काय सांगू शकतो. हे सर्व देवाच्या कृपेने होत आहे.”रिंकुला मेडल देण्यापूर्वी एक बाब अशी घडली की, सर्वांची छाती अभिमानाने फुलली. झिम्बाब्वे दौऱ्यात असलेले फिल्डिंग कोच शुभादीप घोषण यांनी टी. दिलीप यांना व्हिडीओ कॉल केला.

राहुल द्रविडच्या प्रशिक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. त्यांनी झिम्बाब्वे दौऱ्यात चांगली कामगिरी केल्याप्रकरणी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं. “भारतीय खेळाडूंची फिल्डिंग आमच्यासाठी सर्वस्व राहिली आहे. हा एक खेळाचा पैलू आहे. यात आम्ही गेल्या काही वर्षात प्रगती केली आहे. आम्हाला या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहीजे. आम्ही फिल्डिंग मेडलच्या परंपरेबाबत जाणून आहोत. हे मेडल ज्या खेळाडूला दिलं जातं जो खेळाडू चांगली फिल्डिंग करतो.”, असं टी दिलीप यांनी व्हिडीओ कॉलद्वारे सांगितलं.