स्मृतीने लग्न मोडल्याचं जाहीर करताच जेमिमा रॉड्रिग्सची क्रिप्टिक पोस्ट, महिला क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छला यांचा संसार थाटण्यापूर्वीच लग्न मोडलं आहे. दोघांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. पण त्याबाबतच्या चर्चा काही केल्या काही थांबत नाही. स्मृतीची खास मैत्रिण जेमिमा रॉड्रिग्सच्या एका पोस्टने आता लक्ष वेधून घेतलं आहे.

स्मृती मंधानाच्या वैयक्तिक आयुष्यात 23 नोव्हेंबरला वादळ उठलं. कोणाच्या विचारातही नसेल की असं काही घडू शकतं. काही तासातच लग्न मोडलं. पण त्याबाबत कोणीही अधिकृत बोलत नव्हतं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. अखेर हे लग्न मोडल्याचं अधिकृतरित्या दोन्ही बाजूने स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता चर्चांना पूर्णविराम लागला आहे. पण स्मृती मंधानाची मैत्रीण असलेल्या जेमिमाने केलेल्या क्रिप्टिक पोस्टमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्मृतीचं लग्न मोडल्यानंतर जेमिमान तिच्या इंस्टाग्रामवर एका बँडचं गाणं गातानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता परिस्थितीच अशी आहे की कोणत्याही पोस्टचा थेट संबंध स्मृतीच्या लग्नाशी जोडला जाईल. तसंच आता होताना दिसत आहे. पोस्ट केलेल्या व्हिडीओत ‘Man I Nee’ हे गाणं बँड गाताना दिसत आहे. या गाण्यातील बोल सध्याच्या परिस्थिती जुळणारे असल्याने सर्वांचा भुवया उंचवल्या आहेत. हे गाणं स्मृती आणि पलाशच्या प्रकरणाशी जोडलं जात आहे.
“आपण गमावलेल्या वेळेची भरपाई करत आहोत, पण मला अजूनही तुमच्या भावना किंवा हेतू समजत नाहीत. कृपया तुम्हाला काय हवे आहे ते स्पष्टपणे सांगा.”, असे त्या गाण्याचे बोल आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती अनुकूल असे बोल असल्याने चाहते स्मृती आणि पलाशच्या लग्नाशी ही क्रिप्टीक पोस्ट जुळवत आहेत. चाहते जेमिमाच्या भावना आणि मंधानाच्या दुःखाला तिने दिलेल्या पाठिंब्याशी जोडत आहेत. इतकंच काय तर जेमिमाने व्हिडिओच्या थंबनेलवर लिहिले आहे, ‘फक्त ये आणि मला हवा असलेला माणूस हो. ‘ दुसरीकडे, जेमिमा रॉड्रिग्सने पलाश मुच्छला इंस्टाग्रामवर अनफॉलोही केलं आहे.

टीम इंडियाच्या दहा महिला क्रिकेटपटूंनी पलाश मुच्छला अनफॉलो केलं आहे. यात स्मृती मंधानासह, जेमिमा रॉड्रिग्स, रेणुका सिंह ठाकुर, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, राधा यादव, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, शिवाली शिंदे आणि यास्तिका भाटिया यांचं नाव आहे. स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल पहिल्यांदा 2019 मध्ये मुंबईत भेटले होते. त्यांची ओळख एका कॉमन मित्राने करून दिली होती. त्यानंतर एकमेकांशी ओळख वाढली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला गेला. पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं आणि लग्न होण्याआधीच मोडलं.
