लग्न मोडल्यानंतर स्मृती मंधानाने हाती धरली बॅट, आता होणार आणखी आक्रमक!
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं होणारं लग्न मोडलं यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून उडालेला चर्चांना धुराळा आता शांत झाला आहे. पण स्मृती मंधानाने आता हाती बॅट घेतली असून सराव सुरू केला आहे.

स्मृती मंधानाच्या आयुष्यात कभी खूशी कभी गम चित्रपटासारखी स्क्रिप्ट आल्याचं पाहायला मिळाला. वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा आनंद आणि दुसरीकडे लग्न मोडल्याचं दु:ख.. असं सर्व काही एका महिन्यातच घडलं. इतक्या झटपट या गोष्टी होतील असं वाटलं नव्हतं. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर स्मृती मंधाना आणि तिचा प्रियकर पलाश मुच्छल लग्नबंधनात अडकणार म्हणून आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण लग्नात ट्विस्ट आला आणि एखाद्या फिल्मी स्टोरीसारखं हे लग्न मोडलं. दोघांनी लग्न मोडल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे. पलाश मुच्छलने अधिकृतरित्या लग्न मोडल्याचं जाहीर केलं. त्यानंतर स्मृती मंधाना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरली. हाती बॅट घेऊन नेट प्रॅक्टिस करताना दिसली. भारत आणि श्रीलंका यांच्यात टी20 मालिका होणार आहे. त्या मालिकेसाठी स्मृती मंधानाने जोरदार तयारी करत असल्याचं दिसत आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी स्मृती मंधाना संघात असेल असं स्पष्ट दिसत आहे. स्मृती मंधाना नेट प्रॅक्टिस करत असल्याचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ती आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करून असल्याचं दिसत आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर स्मृती मंधाना पहिल्यांदाच हातात बॅट घेऊन सराव करताना दिसली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिका 21 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. 30 डिसेंबर रोजी शेवटचा सामना असणार आहे. पहिले दोन सामना विझागमध्ये खेळले जातील. तर उर्वरित तीन सामने तिरूवनंतपुरममध्ये खेळले जातील. या मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील.
SMRITI MANDHANA IS BACK 🔥
– She has started the practice for the Sri Lanka T20I series. pic.twitter.com/nawrH7ETnB
— Johns. (@CricCrazyJohns) December 8, 2025
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलचं लग्न मोडलं
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडण्याचं खरं कारण काही कळू शकलं नाही. पण लग्न मोडण्यासाठी काही तरी मोठंच कारण असावं यात काही शंका नाही. कारण मांडव सजला होता आणि सात फेरे घेण्यापूर्वीच हा प्रकार घडला नसता. मंधानाने इंस्टाग्रामवर लिहिलं की, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल खूप चर्चा सुरू आहेत आणि मला वाटते की यावेळी बोलणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी खूप खासगी व्यक्ती आहे आणि मला ते असेच ठेवायचे आहे, परंतु मी हे स्पष्ट करू इच्छिते की लग्न रद्द झाले आहे.”
