AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलो; नितेश राणेंचे वक्तव्य चर्चेत

2027मध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कुंभ मेळाव्याचे कामही जोरदार सुरु आहे. 'कुंभमेळ्यात एकही जिहादी आला नाही पाहिजे. त्याला धाक, भीती वाटली पाहिजे' असे विधान मंत्री नितेश राणे यांनी गेले आहे.

कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलो; नितेश राणेंचे वक्तव्य चर्चेत
नितेश राणेImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 15, 2026 | 8:29 AM
Share

नाशिकमध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभ मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात लाखो साधू, संत आणि भाविक या मेळाव्यासाठी नाशिकमध्ये एकवटतील. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्ष तोडीला सुरुवात झाल्यानंतर मोठा वाद झाला होता. त्यानंतर आता राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कुंभमेळाव्याबाबत केलेले व्यक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे.

नाशिक (Nashik News) येथे हिंदू हित रक्षाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक कामगारांच्या सुचीचे प्रकाशन नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी ‘कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर उखडून टाका’ असे विधान केले आहे. ‘हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी केली पाहिजे, ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचे मी स्वागत करतो. मी खारघरला अशीच भूमिका मांडली. आजूबाजूला जिहादी लोकांची दुकानं होती. तेव्हा मी बोललो, नंतर माध्यमांनी मला झोड-झोड झोडले. पण मला तेव्हाही काही वाटले नाही आता ही काही वाटत नाही. हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंबाबत नाही बोलायचे का? मग पाकिस्तान, इस्लामाबाद विषयी बोलणार का? आम्ही धर्माधर्मात भांडणे लावतो असे म्हणतात. ते जे बोलतात त्यांनी येऊन सांगावे’ असे नितेश राणे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोणीही हिंदूंशिवाय दुकाने लावणार नाही. आता रमजान सुरू आहे. त्यांच्या खाद्यपदार्थांचे दुकानं लागतील. तिथे एकतरी हिंदू माणूस शोधून दाखवावा. एकही सापडणार नाही. त्यांच्या कुराणमध्ये लिहिले आहे की, काफिरकडून काही घ्यायचं नाही. त्यामुळे ते तसे वागतात. मग आम्ही जे करतो ते काय वेगळे आहे? मी कुराण 2 वेळा वाचले आहे. 10 टक्के जकात द्या, असे त्यात म्हटले आहे. तो पैसा जिहादसाठी वापरतात. इतरांचा धर्म कमी करून स्वतःचा धर्म वाढवावा, असे लिहिले आहे. आपला पैसा लव्ह जिहादसाठी वापरला जात असेल तर ते आपण घ्यायचे का?

शेवटी नितेश राणे म्हणाले की, आता कुंभमेळ्याची कामे जोरात सुरू आहेत. तुमच्या मागण्या सरकारकडे देतो. कुंभमेळ्यात एकही जिहादी आला नाही पाहिजे. त्याला धाक, भीती वाटली पाहिजे. मी मागे त्र्यंबकेश्वरमध्ये गेलो होतो, तिथे दुकानावर नाव वेगळे होते. आतमध्ये अब्दूल बसलेला होता. त्यांना आता विषय कळला आहे. आम्ही आता देशात कार्यक्रम सुरू करणार आहोत की, हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू घेतल्या पाहिजे. मी इथे आमदार, मंत्री म्हणून नाही तर हिंदू म्हणून आलो आहे. कुंभमेळ्यात लक्ष ठेवा. कोणी इथे स्टॉल लावण्यासाठी आले तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलो आहोत. धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आमच्या राज्यात सर्वात कडक लव्ह जिहादचा कायदा असेल.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल