AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: धरमशालात रोहित शर्मा इतिहास रचणार, मॉर्गन-विलियमसनला मागे टाकून नंबर 1 होण्याची संधी

रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या भारताच्या (Indian Cricket Team) तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याला एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्यानंतर याच महिन्यात त्याच्याकडे कसोटी संघाची कमानही सोपवण्यात आली आहे.

IND vs SL: धरमशालात रोहित शर्मा इतिहास रचणार, मॉर्गन-विलियमसनला मागे टाकून नंबर 1 होण्याची संधी
Rohit Sharma Image Credit source: BCCI
| Updated on: Feb 26, 2022 | 1:43 PM
Share

मुंबई : रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या भारताच्या (Indian Cricket Team) तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याला एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्यानंतर याच महिन्यात त्याच्याकडे कसोटी संघाची कमानही सोपवण्यात आली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये वेस्ट इंडिजला एकही सामना जिंकू दिला नाही. आता टीम इंडियासमोर श्रीलंकेचं (Sri Lanka Cricket Team) आव्हान आहे, या संघाविरुद्ध लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. दुसरा सामना शनिवारी धर्मशाला येथे होणार असून येथे रोहित इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

रोहितच्या नेतृत्वाची सर्वांनाच कल्पना आहे. तो एक उत्तम कर्णधार आहे हे सर्वांना माहीत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पाच जेतेपदं पटकावली आहेत. विराट कोहली जेव्हा कर्णधार होता तेव्हा त्याच्या अनुपस्थितीत रोहित नेतृत्व करत असे आणि तेव्हाही तो खूप यशस्वी ठरला आहे.

मॉर्गन-विल्यमसनला मागे टाकणार!

रोहितने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली असून तो आता इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांना मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. रोहितने मायदेशात म्हणजेच भारतात 16 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 15 सामने भारताने जिंकले आहेत. आतापर्यंत मायदेशात सर्वाधिक T20 सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या बाबतीत रोहित मॉर्गन आणि विल्यमसन यांच्या बरोबरीने उभा आहे. जर भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली धरमशाला येथे विजय मिळवला, तर तो या दोघांना मागे टाकून घरच्या मैदानावर सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा कर्णधार बनेल.

घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या बाबतीत रोहितने भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना आधीच मागे टाकलं आहे. रोहितने विराटपेक्षा दोन सामने आणि धोनीपेक्षा 5 सामने जास्त जिंकले आहे.

इतर बातम्या

IND VS SL: भारताला हरवण्यासाठी श्रीलंकेने निवडला मजबूत संघ, कसोटीसाठी टीमची घोषणा

IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये CSK चा संघ नाही, जाणून घ्या कुठल्या आधारावर दोन गटात झाली संघ विभागणी

IPL 2022 Schedule: मुंबई इंडियन्ससह अन्य संघांचे कोणाविरुद्ध किती सामने होणार, जाणून घ्या सर्व डिटेल्स

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.