IND vs SL, 2nd T20I, LIVE Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला आता अशा मैदानावर सामना खेळायचा आहे जिथे ते कधीही टी-20 सामना जिंकू शकले नाहीत.

IND vs SL, 2nd T20I, LIVE Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना?
India vs Sri Lanka
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 11:49 AM

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात (India vs Sri Lanka) टीम इंडियाने पाहुण्यांची धुळधाण उडवली. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने 62 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, आता टीम इंडियासमोरचं आव्हान मोठं आहे. कारण टीम इंडियाला आता त्या मैदानावर सामना खेळायचा आहे जिथे ते कधीही जिंकू शकले नाहीत. यासोबतच श्रीलंकेनेही टीम इंडियाला (Team India) तिथे धूळ चारली आहे. T20 मालिकेतील पुढील सामना धर्मशाला (India vs Sri Lanka, 2nd T20I) येथे खेळवला जाणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर शनिवारी हा सामना होणार आहे.

अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेवन

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन , दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह

भारताचा टी-20 संघ

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना कधी खेळवला जाईल? भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना 26 फेब्रुवारी (शनिवार) रोजी खेळवला जाणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना कुठे खेळवला जाईल? भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना कधी सुरू होईल? भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना संध्याकाळी 07:00 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक संध्याकाळी 6:30 वाजता होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) कुठे पाहू शकता? भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या T20I सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? सबस्क्रिप्शनसह हॉटस्टारवर सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

इतर बातम्या

IND VS SL: भारताला हरवण्यासाठी श्रीलंकेने निवडला मजबूत संघ, कसोटीसाठी टीमची घोषणा

IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये CSK चा संघ नाही, जाणून घ्या कुठल्या आधारावर दोन गटात झाली संघ विभागणी

IPL 2022 Schedule: मुंबई इंडियन्ससह अन्य संघांचे कोणाविरुद्ध किती सामने होणार, जाणून घ्या सर्व डिटेल्स

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.