आयपीएल 2027 पूर्वी विजेता आरसीबी संघ या खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता, जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पटकावलं, सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. या पर्वात 24 खेळाडूंपैकी 15 खेळाडूंना मैदानात खेळण्याची संधी दिली. पण पुढच्या पर्वापूर्वी काही खेळाडूंना रिलीज केल जाण्याची शक्यता आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एका ट्रॉफीसाठी कासावीस झालेल्या आरसीबीने सलग दोन ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. गेल्या काही वर्षात ट्रॉफीपासून वंचित असलेल्या आरसीबी संघ जेतेपद मिळवेल की नाही अशी चर्चा होती. पण आता इतिहास बदलला आहे, आरसीबीने 2025 आणि 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे. आता जेतेपदाची हॅटट्रीक साधण्यासाठी आरसीबीने कंबर कसली आहे. यासाठी आरसीबीचं लक्ष मिनी लिलावाकडे असणार आहे. त्यामुळे संघातील काही खेळाडूंना रिलीज करावं लागेल. पण सध्याच्या संघातील बहुतांश खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विजयी संघ आणि मुख्य संघात काही बदल होणार नाही. पण मिनी लिलावात भाग घ्यायचा तर काही रक्कम असणं आवश्यक आहे. त्यामुळे काही खेळाडूंना रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. आरसीबी तीन खेळाडूंना रिलीज करू शकते.
आरसीबीला आपल्या पर्समध्ये पैसे वाढवायचे असतील तर यश दयाळला संघातून रिलीज करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यंदाच्या पर्वात यश दयाल काही खेळला नाही. पुढच्या पर्वात खेळायचं असेल तर आरोपातून दोषमुक्त व्हावं लागेल. त्यामुळे आरसीबी यश दयालला रिलीज करून पर्समध्ये 5 कोटींची रक्कम वाढवेल.
अभिनंदन सिंगने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी तीन सामने खेळले आहेत. तीन सामन्यात अभिनंदनने 58 चेंडूत फक्त 3 विकेट काढल्या आहेत. तसेच 122 धावा दिल्यात. त्यामुळे त्याला रिलीज करण्याची शक्यता वाढली आहे. त्याला आयपीएल 2025 मेगा लिलावात 30 लाखांच्या बेस प्राईसवर घेतलं होतं.
नुवान तुषाराच्या जागी आरसीबीने रिचर्ड ग्लीसनची संघात निवड केली होती. पण त्याला पुढच्या पर्वात संघासोबत ठेवणं जरा कठीण दिसत आहे. त्याच्या ऐवजी नुवानला संधी मिळेल असं दिसत आहे. त्यामुळे आयपीएल 2027 स्पर्धेत ग्लीसन संघात दिसला नाही तर आश्चर्य वाटायला नको. आरसीबीने ग्लीसनसाठी 1.60 कोटी रुपये मोजले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान ठुषारा, वेणेश कुमार, नुवान ठुषारा, राधाकृष्णन. अभिनंदन सिंग, सुयश शर्मा, जेकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, रिचर्ड ग्लीसन.