
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेत आता फक्त उपांत्य फेरीतील 2 आणि अंतिम फेरी असे एकूण 3 सामनेच बाकी आहेत. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात गतउपविजेत्या दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडचाही एकूण दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या प्रयत्नात दोघांपैकी कोण यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मिचेल सँटनर उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. तर एडन मार्करम याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दक्षिण आफ्रिकेने 2024 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानवर मात करत अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र अंतिम फेरीत त्यांना भारताकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे यंदा दक्षिण आफ्रिकेची ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात त्याआधी दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड विरुद्ध कशी कामगिरी करते याकडे क्रिकेट रसिकांचं बारीक लक्ष असणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामना बुधवारी 4 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकवर सामन्यातील प्रत्येक अपडेट आणि लाईव्ह स्कोअर जाणून घेता येईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.