AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 Semi Final SA vs NZ : उपांत्य फेरीसाठी दोन्ही संघ या खेळाडूंवर टाकतील विश्वास!

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. प्लेइंग 11 काय असेल याबाबत चर्चा सुरू आहे.

T20 World Cup 2026 Semi Final SA vs NZ : उपांत्य फेरीसाठी दोन्ही संघ या खेळाडूंवर टाकतील विश्वास!
T20 World Cup 2026 Semi Final SA vs NZ : उपांत्य फेरीसाठी दोन्ही संघ या खेळाडूंवर टाकतील विश्वास!Image Credit source: Proteas Men Twitter
| Updated on: Mar 03, 2026 | 8:08 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येत आहेत. हा सामना 4 मार्च रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरी गाठण्याचा दोन्ही संघाचा मानस आहे. दक्षिण अफ्रिकेने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. तर न्यूझीलंडचा संघ नशिबाच्या जोरावर उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे. नेट रनरेटचं गणित सोडवण्यात पाकिस्तानचा संघ अपयशी ठरला आणि उपांत्य फेरीचं तिकीट न्यूझीलंडला मिळालं. आता उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ भिडणार आहेत. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास पाहिला तर दक्षिण अफ्रिकेचा संघ कायम न्यूझीलंडवर भारी पडला आहे. त्यात सध्याचा दक्षिण अफ्रिकेचा फॉर्म पाहता न्यूझीलंडसमोर कठीण आव्हान असणार आहे. या स्पर्धेच्या साखळी फेरीत दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडचा धुव्वा उडवला होता.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका संभाव्य प्लेइंग 11 :क्विंटन डी कॉक, रायन रिकेल्टन, एडेन मार्करम, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यानसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

न्यूझीलंड संभाव्य प्लेइंग 11 :फिन एलन, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर, जेम्स नीशम, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ईश सोढी

काय झालं होतं साखळी फेरीच्या सामन्यात

न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ साखळी फेरीत आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने 20 षटकात 7 गडी गमवून 175 धावा केल्या. तसेच विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 3 गडी गमवून 17.1 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात मार्को यानसेन सामनावीर ठरला होता. त्याने 4 षटकात 40 धावा देत 4 गडी बाद केले होते. याच सामन्यात धावांचा पाठलाग करताना कर्णधार एडन मार्करम याने नाबाद 86 धावांची खेळी केली होती. त्याने 44 चेंडूंचा सामना केला आणि 8 चौकार आणि 4 षटकार मारले होते.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?