AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: आजच्या CSK vs SRH सामन्यात चेन्नईवर पराभवाचे सावट, ‘हे’ आहे कारण

आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची लढत आज सर्वात खाली असणाऱ्या सनरायजर्स हैद्राबादशी असली तरी हा सामना हैद्राबाद जिंकू शकते. याला काही खास कारणं आहेत.

IPL 2021: आजच्या CSK vs SRH सामन्यात चेन्नईवर पराभवाचे सावट, 'हे' आहे कारण
सनरायजर्स हैद्राबाद संघ
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 5:51 PM
Share

IPL 2021: अत्यंत चुरशीत सुरु असलेल्या इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या हंगामात (IPL 2021) आता हळूहळू काही संघ प्लेऑफमध्ये स्थान पक्कं करत आहे. आजचा 43 वा सामना आज सनरायजर्स हैद्राबाद  (SRH) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (CSK) यांच्यात असून यात विजयानंतर धोनीची टीही प्लेऑफमधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित करेल. पण हा सामना जिंकणं चेन्नईसाठी तसं अवघड असणार आहे. यामागे कारण सनरायजर्स हैद्राबादचा परत आलेला फॉर्म आणि दाखल झालेला टी-20 स्पेशलिस्ट फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) हे आहे.

हैद्राबाद संघाची यंदाच्या हंगामातील कामगिरी अत्यंत खराब आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात 10 पैकी केवळ 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांना 4 गुणांसह शेवटच्या स्थानावर रहावं लागलं आहे. पण अशातच त्यांनी सोमवारी (27 सप्टेंबर) राजस्थान संघाला तब्बल 7 विकेट्सनी मात देत एकप्रकारे यशस्वी पुनरागमन केलं आहे. यावेळी संघाचा धाकड फलंदाज जेसन रॉयनेही यंदाच्या हंगामात पदार्पण केल्याने संघ आणखी ताकदवर झाला आहे. त्यामुळे हैद्राबादचा आत्मविश्वास वाढला आहे. ज्यामुळे चेन्नईला हैद्राबादचा वाढलेला आत्मविश्वास, पुन्हा आलेला फॉर्म आणि जेसन रॉय या तीन गोष्टीमुळे पराभव पत्करावा लागू शकतो.

हैद्राबाद विरुद्ध चेन्नई Head to Head

चेन्नई आणि हैद्राबादचे संघ आतापर्यंत 16 वेळा एकमेंकासोबत भिडले आहेत. त्यापैकी तब्बल 12 सामने जिंकत चेन्नईने एकहाती वर्चस्व गाजवले आहे. तर हैद्राबाद केवळ 4 सामने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. दरम्यान राजस्थानला पराभूत करुन हैद्राबादने मिळवलेला विजय आजच्या सामन्यात मिळवण्यातही ते यशस्वी राहणार का हे पाहणे औत्सुक्याचे राहिल.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

चेन्नई सुपरकिंग्स –एमएस धोनी (कर्णधार-विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसी, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जॉश हेजलवुड

सनरायजर्स हैद्राबाद – डेव्हिड वॉर्नर, रिद्धिमान साहा  (यष्टीरक्षक), मनिष पांडे, केन विल्यमसन (कर्णधार), विराट सिंग, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा

हे ही वाचा

IPL 2021: विराटसेना सूसाट! मॅक्सवेलचं दमदार अर्धशतक, राजस्थानवर 7 गडी राखून विजय

IPL 2021: मुंबई इंडियन्स संघात बदल, अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर, नव्या खेळाडूला संधी, ‘हे’ आहे कारण

IPL 2021 : मॉर्गनसोबतच्या वादावर आर. अश्विनचं सडेतोड उत्तर, टीकाकारांची पोलखोल करत केली बोलती बंद

(SRH return form and jason roys inclusion may beat CSK in todays IPL match between SRH vs CSK)

Follow Us
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...