नताशा सोबत राहून मी… हे काय बोलून गेला होता हार्दिक पांड्या

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांच्यातील नातं संपुष्टात आल्याचं बोललं जात आहे. दोघे ही विभक्त झाले असून दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता हार्दिक पांड्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत.

नताशा सोबत राहून मी... हे काय बोलून गेला होता हार्दिक पांड्या
| Updated on: May 28, 2024 | 4:23 PM

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. नताशा आणि हार्दिक यांच्यात विभक्त झाल्याची बातमी तेव्हा समोर आली जेव्हा नताशाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पांड्या आडनाव काढून टाकले. हार्दिक आणि नताशा यांच्याकडून यावर कुठलीही  प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर ही ती मुंबईच्या एकाही सामन्यात मैदानावर दिसली नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये दुरावा आल्याचे हे संकेत मानले जात आहेत.

2020 मध्ये झाला होता विवाह

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांचा विवाह 2020 मध्ये झाला होता. गेल्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी रितीरिवाजांनुसार पुन्हा लग्न केले होते. आता त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरत असताना आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये हार्दिक त्याच्या लग्नाबद्दल मजेशीरपणे बोलत आहे. यामध्ये हार्दिक पांड्या म्हणतो की, लग्नानंतर मी अधिक विनम्र आणि सहनशील झालो आहे. कारण नताशासोबत राहण्यासाठी खूप संयम आवश्यक आहे.

कशी झाली होती दोघांची भेट

लग्नाच्या व्हिडीओमध्ये नताशा सांगतेय की ती हार्दिकला पहिल्यांदा कशी भेटली होती. नताशा सांगते की, ती एका मैत्रिणीमार्फत हार्दिकला भेटली होती. नताशा सांगते की ती तिच्या मैत्रिणींसोबत बसली होती, यावेळी हार्दिकने आत प्रवेश करताच एक वेगळीच ठिणगी पसरली. असे व्यक्तिमत्त्व मी यापूर्वी पाहिले नसल्याचे तिने सांगितले. तो इतका मनमिळाऊ आहे की पहिल्यांदा भेटल्यावर त्याने हस्तांदोलन करण्याऐवजी मला मिठी मारली. हार्दिकने सांगितले की तो पहिल्याच नजरेत नताशाच्या प्रेमात पडला होता.

पोटगी म्हणून किती संपत्ती द्यावी लागणार?

नताशा आणि हार्दिक पांड्या यांच्यात जर घटस्फोट झाला तर पोटगी म्हणून संपत्तीचा ७० टक्के भाग नताशाला द्यावा लागणार असल्याची देखील चर्चा आहे. हार्दिक आणि नताशा यांना एक मुलगा देखील आहे.

हार्दिककडे 91 कोटींची संपत्ती आहे. मुंबईत त्याचे 30 कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. वडोदरा याठिकाणी देखील हार्दिकचा एक बंगला आहे. हार्दिककडे अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे.