AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sourav ganguly IPL 2023 : सुनील गावस्करांनी आपल्या लेखातून सौरव गांगुलीवर साधला निशाणा, म्हणाले…..

Sourav ganguly IPL 2023 : सुनील गावस्कर हे परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकदा कॅमेऱ्यासमोर बोलताना मोठ्यातल्या मोठ्या क्रिकेटपटूला सुद्धा खडेबोल सुनावले आहेत.

Sourav ganguly IPL 2023 : सुनील गावस्करांनी आपल्या लेखातून सौरव गांगुलीवर साधला निशाणा, म्हणाले.....
sunil gavaskar on saurav ganguly
| Updated on: May 24, 2023 | 7:25 PM
Share

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला नाही. 2019 च्या आधी ही टीम प्लेऑफमध्ये पोहोचली होती. यावर्षी दिल्लीची टीम खूप खराब खेळली. दिल्लीची टीम आयपीएल 2023 मध्ये नवव्या स्थानावर होती. दिल्लीच्या टीमकडे जागतिक क्रिकेटमधील दोन यशस्वी कर्णधार सौरव गांगुली आणि रिकी पॉन्टिंग होते. हे दोन्ही माजी कर्णधार दिल्लीच्या सपोर्ट् स्टाफमध्ये आहेत. पण तरीही दिल्लीची टीम प्रभावी कामगिरी करु शकली नाही.

हे दोघे असूनही दिल्लीच्या टीमने चांगली प्रगती केली नाही, असं सुनील गावस्कर यांचं म्हणण आहे. दिल्लीची टीम यावेळी नियमित कॅप्टन ऋषभ पंत शिवाय खेळत होती. मागच्यावर्षी कार अपघातात ऋषभ पंत जखमी झाला. त्यामुळे तो या सीजनमध्ये खेळू शकला नाही. डेविड वॉर्नरने टीमच नेतृत्व केलं. वॉर्नरची बॅट चालली पण तो कॅप्टनशिपमध्ये फेल ठरला.

‘इंग्लिश क्रिकेटपटूंना भारतीय खेळाडू ओळखता येत नाहीत’

पॉन्टिंग असूनही दिल्लीच्या टीममध्ये सुधारणा झालेली नाही, असं सुनील गावस्कर यांचं मत आहे. दिल्लीने युवा खेळाडूंना जास्त संधी दिली नाही, असं, गावस्कर म्हणाले. स्पोर्टस्टारमधल्या आपल्या कॉलममध्ये गावस्कर म्हणाले की, “ज्या समस्या सहजतेने सुटायला पाहिजे होत्या, त्या सुटल्या नाहीत. भाषा यामध्ये मुख्य समस्या आहे. इंग्लिश क्रिकेटपटूंना भारतीय खेळाडू ओळखता येत नाहीत. त्यामुळे यश ढुल, प्रियम गर्ग, सर्फराज खान जास्त पुढे जाऊ शकले नाहीत” अक्षर पटेलबद्दल गावस्करांच मत काय?

गावस्करांच्या मते, दिल्लीच्या टीमने ऑलराऊंडर अक्षर पटेलचा योग्य पद्धतीने वापर केला नाही. दिल्लीने अक्षरला फलंदाजीत प्रमोट करायला पाहिजे होतं. दिल्लीची टीम या आयपीएलमध्ये 14 सामने खेळली. त्यात त्यांना फक्त पाच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?