T20 WC Prize Money: वर्ल्ड कप विजेत्या टीमवर पडणार पैशांचा पाऊस, चॅम्पियन संघाला मिळणार तब्बल इतके कोटी

| Updated on: Sep 30, 2022 | 1:58 PM

T20 WC Prize Money: उपविजेत्या आणि अन्य टीम्सना किती रक्कम मिळणार ते जाणून घ्या. हा वर्ल्ड कप टीम्सना मालामाल करणार

T20 WC Prize Money: वर्ल्ड कप विजेत्या टीमवर पडणार पैशांचा पाऊस, चॅम्पियन संघाला मिळणार तब्बल इतके कोटी
world cup prize money
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल आयसीसीने बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. चॅम्पियन बनणाऱ्या टीमला 1.6 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 13 कोटीच्या घरात रक्कम मिळणार आहे. 13 नोव्हेंबरला ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात वर्ल्ड कपची फायनल होणार आहे.

त्यावेळी फायनलमधील विजेत्या संघाला 13 कोटीच्या घरात रक्कम मिळेल. उपविजेत्या संघाला निश्चितच त्याच्या अर्धी रक्कम मिळेल. म्हणजे 6 कोटीच्या घरात ही रक्कम असेल.

वर्ल्ड कपमध्ये एकूण किती टीम?

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये एकूण 16 टीम्स सहभागी होणार आहेत. बक्षिसाची एकूण रक्कम 5.6 मिलियन डॉलर म्हणजे 45 कोटीच्या घरात आहे. सेमीफायनलमध्ये हरणाऱ्या टीम्सना 4 लाख डॉलर म्हणजे 3. 26 कोटी रुपये  मिळतील. जवळपास महिनाभर टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा चालणार आहे.

प्रत्येक मॅचनंतर विजेत्या टीमला किती रक्कम मिळणार?

सुपर 12 मधून बाहेर होणाऱ्या 8 टीम्सना प्रत्येकी 70 हजार डॉलर मिळतील. आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 12 फेज राऊंडमध्ये एकूण 30 मॅच होतील. प्रत्येक मॅचनंतर विजेत्या टीमला मागच्यावर्षी प्रमाणे 40 हजार अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार दिला जाईल.

वर्ल्ड कपमध्ये कुठल्या टीम्स खेळणार?

अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या आठ टीम्स आधीच सुपर 12 स्टेजमध्ये पोहोचल्या आहेत. नामिबिया, श्रीलंका, नेदरलँड, संयुक्त अरब अमिराती आणि झिम्बाब्वे या टीम्स ग्रुप बी मध्ये आहेत. पहिल्या राऊंडमधील प्रत्येक विजेत्या टीमला 40 हजार डॉलर मिळतील.

कधीपर्यंत चालणार वर्ल्ड कप?

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच ऑस्ट्रेलियाकडे यजमानपद आहे. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 पर्यंत ही स्पर्धा चालेल. हा 8 वा टी 20 वर्ल्ड कप आहे. ऑस्ट्रेलियाने मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवलं होतं.