AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: DGCA विरोधात FIR दाखल करण्यास पोलिसांचा नकार, अजितदादांना न्याय मिळत नसेल सामान्यांना कसा न्याय मिळणार? रोहित पवार आक्रमक

Rohit Pawar Allegation on Marine Lines Police: डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार हे मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून होते. पण पोलिसांनी FIR नोंदवण्यास नकार दिल्याने बारामतीत एफआयआर नोंदवणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर यावेळी गंभीर आरोप केले.

Rohit Pawar: DGCA विरोधात FIR दाखल करण्यास पोलिसांचा नकार, अजितदादांना न्याय मिळत नसेल सामान्यांना कसा न्याय मिळणार? रोहित पवार आक्रमक
रोहित पवार आक्रमकImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 25, 2026 | 2:26 PM
Share

Rohit Pawar on DGCA : आमदार रोहित पवार हे अजितदादांच्या विमान अपघात की घातपात याविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी DGCA, सीआयडी, विमान वाहतूक मंत्र्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. VSR कंपनीला वाचवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाप्रकरणी रोहित पवार यांनी DGCA विरोधात तक्रार करण्याची मागणी केली. ते थेट मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी आणि आमदार संदीप क्षीरसागर हे पण उपस्थित होते. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी आणि त्यांच्यात मोठा वाद पेटला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.

पोलिसांशी हुज्जत

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, अजितदादांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी, आ. नाईकवडी आणि अनेक पदाधिकारी त्यांच्या सोबत होते. एफआयआर आज का करण्याचा निर्णय घेतला याची माहिती त्यांनी दिली. डीजीसीएने एक परिपत्रक काढलं. व्हीएसआर कंपनीच्या २५ पैकी ५ विमान थांबवण्याचा आदेश दिले. व्हीएसआर कंपनी विमान अपघाताला कारणीभूत असल्याचे अप्रत्यक्ष समोर आले. त्याआधारे आम्ही एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. नवीन फौजदारी कायद्याच्या आधारे आम्ही गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. त्यावेळी अधिकार्‍यांशी वाद झाला.

तो फोन कुणाचा?

अजितदादांच्या विमान अपघातात पाच लोकांचा मृत्यू झाला. ही सर्व घटना आता सर्वांना माहिती आहे. एफआयआर करताना एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी वाद झाला. त्यावेळी कनिष्ठ अधिकाऱ्याने हुज्जत घातली. एफआयआर नोंदवायला सुरुवात झाली होती. माझं स्टेटमेंट नोंदवायला सुरूवात झाली तेव्हाच एका मोठी अधिकारी तिथे आले. डीसीपी तिथे आले, ते म्हणाले गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही एफआयआर दाखल करून घेऊ शकत नाही. तुम्हाला कुणाला सांगायचे ते सांगा आम्ही गुन्हा नोंदवणार नसल्याचे अधिकारी म्हणाले. मग त्यांना कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचा फोन आला असा सवाल रोहित पवार यांनी केला.

अजितदादांना न्याय नाही तर सर्वसामान्यांना कसा मिळणार?

पाठिंबा असल्याशिवाय अधिकारी अशी मग्रुरी करू शकत नाही असा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. मारामारी झाली तरी गुन्हा नोंदवल्या जातो, काँग्रेस कार्यकर्त्यांनी शर्ट काढले तर एफआयआर नोंदवला जातो. अजितदादांचा मृत्यू झाला. घात की अपघात याविषयी आम्ही शंका व्यक्त करत आहे. मग अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा नियम का, असा सवाल त्यांनी केला. मरीन ड्राईव्ह पोलीस एफआयआर नोंदवत नाही, आता बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न करू, उद्या सकाळी 10 वाजता पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.

एफआयआर करण्यापासून आम्हाला का रोखल्या जात आहे असा सवाल रोहित पवारांनी केला. या राज्यात अजितदादांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना कसा न्याय मिळेल. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय सत्रात जाऊन घसा कोरडा होईपर्यंत कशी मागणी करणार, इथं एफआयआरचं नोंदवला जात नाही असा संताप रोहित पवारांनी व्यक्त केला.

रोहित पवार यांची तक्रार स्वीकारली

दरम्यान रोहित पवार यांनी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याचा दावा केला. तर पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तनावरही त्यांनी आक्षेप नोंदवला. पोलीस उर्मटपणे वागल्याचे आणि त्यांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचे रोहित पवार म्हणाले. तर याविषयावर पोलीसांची बाजू समोर आली आहे. रोहित पवार यांनी दिलेली तक्रार स्वीकारली आहे. तपासून योग्य ती कार्यवाही करू असे मुंबई पोलिसांनी कळवल्याचे समजते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...