AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021 : 2014 मध्ये वर्ल्डकप जिंकला, आता स्पर्धेत एण्ट्री मिळवण्यासाठी धडपड

आयसीसी टी-20 विश्वचषकाची स्पर्धा यंदा युएई आणि ओमन देशांत पार पडणार आहे. या भव्य स्पर्धेतील गट नुकतेच आयसीसीने (ICC) जाहीर केले आहेत.

T20 World Cup 2021 : 2014 मध्ये वर्ल्डकप जिंकला, आता स्पर्धेत एण्ट्री मिळवण्यासाठी धडपड
श्रीलंका संघाने भारताला नमवत 2014 ;चा टी-20 विश्वचषक जिंकला होता
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 5:55 PM
Share

मुंबई : आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाचा (ICC T20 World Cup 2021) थरार 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमन या देशांमध्ये रंगणार आहे. या भव्य स्पर्धेतील गट आयसीसीने (ICC) नुकतेच जाहीर केले आहेत. यावेळी एकेकाळचा विश्वविजेता संघ अंतिम 12 (T 20 World Cup Super 12) मध्येही स्थान मिळवू शकलेला नाही. त्याला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधी ग्रुप स्टेजेसमध्ये जिंकावे लागणार आहे.

हा संघ म्हणजे 2014 सालचा टी-20 विश्वचषक जिंकलेला श्रीलंका क्रिकेट संघ (Sri Lanka Cricket Team) आहे. त्यावेळी स्पर्धेतील सर्वांत ताकदवर संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीलंका संघाला आता स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठीही धडपड करावी लागत आहे. याचे कारण मागील काही काळातील संघाची अत्यंत सुमार कामगिरी. एकेकाळी कुमार संगकारा, महेला जयवर्धने, लसिथ मलिंगा अशा एक न अनेक दिग्गजांचा भरणा असलेल्या संघाला आता साधा एक कर्णधार निवडण्यासाठीही मोठी मेहनत करावी लागत आहे. नुकत्याच इंग्लंड दौऱ्यातील तिन्ही टी-20 मॅचेसमध्येही श्रीलंका संघाला पराभव पत्करावा लागला. आता श्रीलंकेचा संघ भारताचे युवा खेळाडू असणाऱ्या संघासोबत 18 जुलैपासून आणि एकदिवसीय आणि नंतर टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अशी मिळवता येईल स्पर्धेत एन्ट्री

यंदा विश्वचषकाच्या 12 क्रिकेट संघात ‘सुपर 12’ चा थरार रंगणार आहे. यामध्ये  ग्रुप 1 मध्ये 6 आणि ग्रुप 2 मध्ये 6 संघ आपआपसांत भिडणार आहेत. ज्यामध्ये दोन्ही गटात प्रत्येकी 4 संघ आधीच निवडले गेले आहेत. पण इतर 4 संघाना सुपर 12 सह स्पर्धेत एन्ट्रीसाठी दोन ग्रुप स्टेजेसमधील सामन्यांत क्वॉलीफाय करावं लागणार आहे. याच ग्रुप्समध्ये श्रीलंकेचा संघ असून त्याला ग्रुप A मधील आयर्लंड, नाम्बिया आणि नेदरलँड संघासोबत जिंकल्यानंतर सुपर 12 मध्ये जागात मिळवता येणार आहे.

4 वर्षात 10 वा कर्णधार!

श्रीलंका संघ 18 जुलैपासून भारताविरुद्ध आधी एकदिवसीय आणि नंतर टी-20 सामने खेळणार आहे. दरम्यान इंग्लंडच्या दौऱ्यात श्रीलंकेचा कर्णधार असणाऱ्या कुसल परेराने सुमार कामगिरी केल्यामुळे संघाला पुन्हा एका नव्या कर्णधारीची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मागील 4 वर्षांतील हा श्रीलंका संघाचा 10 कर्णधार असेल. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, संघाचा अष्टैपूलू खेळाडू दासुन शनाकाला कर्णधारपद सोपवण्याची चर्चा आहे.  29 वर्षीय शनाकाने आतापर्यंत श्रीलंका संघासाठी 28 वनडे आणि 43 टी-20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने 611 धावांसह 10 विकेट घेतले आहेत.तर टी-20 मध्ये 548 धावांसह 11 विकेट्स पटकावले आहेत.

 संबंधित बातम्या 

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

IND vs SL : सामना सुरु होण्याआधीच श्रीलंका संघाला दोन झटके, हे दोन खेळाडू सामना खेळण्यापासून मुकणार

भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात

(T20 World Cup 2021 Groups Announced 2014 Winner Sri Lanka Team need to Clear Group Stage to enter in Super 12)

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!