AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : सामना सुरु होण्याआधीच श्रीलंका संघाला दोन झटके, हे दोन खेळाडू सामना खेळण्यापासून मुकणार

भारत आणि श्रीलंका संघातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. मात्र सामना सुरु होण्यापूर्वीच श्रीलंकन संघाला दोन मोठे झटके बसले आहेत.

IND vs SL : सामना सुरु होण्याआधीच श्रीलंका संघाला दोन झटके, हे दोन खेळाडू सामना खेळण्यापासून मुकणार
श्रीलंका संघाचे दोन महत्त्वाचे खेळाडू भारताविरुद्धचे सामने खेळू शकणार नाहीत.
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 2:25 PM
Share

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याला अवघा एक दिवस राहिला असतानाच श्रीलंकन संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण भारताविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहेत. या खेळाडूंमधील कर्णधार विकेटकिपर कुसल परेरा (Kusal Perera) याचे नाव गुरुवारीच समोर आले होते. पण आता संघाचा वेगवान गोलंदाज बिनुरू फर्नांडो (Binura Fernando) देखील दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला हुकणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) ट्विट करत ही माहिती दिली.

आयसीसीसोबतच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने देखील याबाबत माहिती दिली. श्रीलंका क्रिकेटने त्यांच्या वेबसाइटवर लिहिले आहे की, ‘कुसल परेरा दुखापतीमुळे भारताविरुद्धची वनडे आणि टी-20 मालिका खेळू शकणार नाही. सरावादरम्यान त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती.’

फर्नांडोच्या गुडघ्याला दुखापत

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने फर्नांडोबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘फर्नांडोच्या डाव्या गुडघ्याला  15 जुलै रोजी सराव करताना दुखापत झाली. त्याला लिगामेंटचा त्रास आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये तो खेळू शकणार नाही.’

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

भारतीय विरुद्ध श्रीलंका

भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादीत षटकांचे सामने पार पडणार आहेत. ज्यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांचा समावेश आहे. आधी 13 जुलै रोजी सामन्यांना सुरुवात करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या संकटामुळे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.

सामन्यांचे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना – 18 जुलै
  • दुसरा एकदिवसीय सामना –  20 जुलै
  • तिसरा एकदिवसीय सामना – 23 जुलै
  • पहिला टी-20 सामना –  25 जुलै
  • दुसरा टी-20 सामना –  27 जुलै
  • तिसरा टी-20 सामना –  29 जुलै

हे ही वाचा :

शिखरची बासरी, पृथ्वी शॉचं गाणं, हा सुमधूर व्हिडीओ पाहाच

Video : कुलदीप, चहलची धमाल, दमशेराजमध्ये कोण जिंकलं? तुम्हीच पाहा

IND vs SL : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ सलामीवीर संघाबाहेर, दुखापतीमुळे मुकणार पहिला सामना

(Sri Lankan Key Players Binura Fernando and Kusal Perera out of India Series due to Injuries)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.