AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ सलामीवीर संघाबाहेर, दुखापतीमुळे मुकणार पहिला सामना

भारत आणि श्रीलंका संघातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ कसून सराव करत आहेत.

IND vs SL : पहिल्या एकदिवसीय सामन्यात 'हा' सलामीवीर संघाबाहेर, दुखापतीमुळे मुकणार पहिला सामना
कुसल परेरा
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 3:51 PM
Share

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. आधी 13 जुलैला सुरु होणारी ही मालिका श्रीलंकन संघात काही कोरोनाच्या केसेस आढळल्यामुळे पुढे ढकलण्यात आली. आता सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच श्रीलंका क्रिकेट संघावर (Sri Lanka Cricket Team) आणखी एक संकट आले असून त्यांचा कर्णधार आणि सलामीवीर कुसल परेरा (Kusal Perera) दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकू शकतो.

एकीकडे सामने खेळणार असलेल्या संपूर्ण संघाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संघ प्रशासनाला दिलासा मिळाला होता. पण तेव्हाच कर्णधार परेराच सामन्याला मुकणार असल्याने संघाच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. परेरा याच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळेच तो संघासोबत सरावरही करत नव्हता. त्यामुळे अशा स्थितीत तो 18 जुलैचा पहिला सामना खेळण्याची शक्यता जवळपास संपली आहे. श्रीलंकेतील न्यूजवायर या वेबसाईटला श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कुसल परेराची दुखापत काहीशी गंभीर असल्याने तो ट्रेनिंग सेशनलाही हजर नव्हता. त्यामुळे त्याच्या पहिल्या सामन्यात खेळण्याबाबत अजूनही निर्णय झाला नसून लवकरच निर्णय घेतला जाईल,

परेराची कर्णधारपदावरुन हकालपट्टी?

कुसल परेराला यंदाच श्रीलंका संघाच्या एकदिवसीय आणि टी20 सामन्यांसाठी कर्णधार बनवलं होतं. पण मागील बऱ्याच सामन्यांपासून संघाने अत्यंत खराब प्रदर्शन केलं. स्वत: परेराचं प्रदर्शनही निराशाजनक असल्याने त्याला कर्णधार पदावरुन हटवण्याच्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. श्रीलंकाने मीडियातील माहितीनुसार भारताविरुद्धच्या मालिकेसाठी अष्टपैलू दासुन शनाका याला कर्णधारपद दिले जाऊ शकते.

हे ही वाचा :

ऋषभ पंतला कोरोना, आता विराट कोहलीचा हुकमी एक्का इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?

मोठी बातमी : ऋषभ पंतला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, टीम इंडियाला मोठा झटका, आता कीपर कोण?

भारतीय खेळाडूंचा अतिशाहणपणा, गरज नसताना मिरवले, आता कोरोनाने जिरवली!

(In India vs Sri Lanka First ODI Sri lankan Opener Kusal Perera May Not Play Due to Injury)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.