ऋषभ पंतला कोरोना, आता विराट कोहलीचा हुकमी एक्का इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 15, 2021 | 3:05 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघात कोरोनाने एन्ट्री केली असून यष्टीरक्ष ऋषभ पंतला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे विकेटकीपर म्हणून कोण जबाबदारी पेलनार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ऋषभ पंतला कोरोना, आता विराट कोहलीचा हुकमी एक्का इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?
के एल राहुल
Follow us

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचं बिगुल वाजलं असून सलामीच्या सामन्यासाठी भारत आणि इंग्लंड (India vs England) हे संघ तयार झाले आहेत. 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेने WTC 23 ची सुरुवात होणार असून या सामन्यांपूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाल्यामुळे संघासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दरम्यान पंत बाधित झाल्यमुळे यष्टीरक्षक म्हणून इंग्लंडविरुद्ध कोण खेळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या खेळाडूंमध्ये भारताकेड दोन तगडे पर्याय यष्टीरक्षक म्हणून उपलब्ध आहेत. के एल राहुल (K L Rahul) आणि रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही उत्तम यष्टीरक्षक फलंदाज असल्याने नेमकं विराट कोणाला मैदानात उतरवणार हे पहाव लागेल. कारण आतापर्यंतचा इतिहास पाहता दोघांपैकी कोणालाही खेळवण्याचे चान्सेस आहेत.

के एल राहुल अधिक यशस्वी

राहुल आणि साहा यांच्यात विचार केला असता साहा अधिक अनुभवी आहे. मात्र मागील काही वर्षातील राहुलची कामगिरी पाहता त्याच्याकडून संघाला अधिक अपेक्षा आहेत. ज्यामुळे त्यालाच इंग्लंडमध्ये संधी देऊन कोहली आपला हुकुमी एक्का राहुलच्या रुपात सामन्यात उतरवण्याच्या अधिक आशा आहेत. 2014 पासून खेळत असलेल्या राहुलने आतापर्यंत 5 शतकं आणि 11 अर्धशतकांच्या जोरावर 2 हजार 6 धावा केल्या आहेत. तर साहा 2010 पासून खेळत असूनही त्याने केवळ 3 शतकं आणि 5 अर्धतकं ठोकत 1 हजार 251 धावाच केल्या आहेत.

इंग्लंडमध्ये साहावर विश्वास?

आतापर्यंतचे आकडे पाहता राहुल अधिक यशस्वी आहे. मात्र तरी देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावेळी (WTC Final) न्यूझीलंड (IND vs NZ) विरुध्द अंतिम 15 मध्ये राहुलला नाही तर साहाला स्थान देण्यात आलं होतं. क्षेत्ररक्षणावेळी काही काळ पंतच्या जागी साहा मैदानावर देखील आला होता. त्यामुळे इंग्लंडची खेळपट्टी पाहता अनुभवी साहाला पंतच्या जागी खेळवले जाऊ शकते.

हे ही वाचा :

मोठी बातमी : ऋषभ पंतला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, टीम इंडियाला मोठा झटका, आता कीपर कोण?

भारतीय खेळाडूंचा अतिशाहणपणा, गरज नसताना मिरवले, आता कोरोनाने जिरवली!

(Before Eng vs Ind Test series Rishabh Pant tested Corona Positive Virat Kohli Will Take KL Rahul or Wridhiman Saha as Wicketkeeper)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI