AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेरी जित मेरी जित, तेरी हार मेरी हार… NZ vs AFG सामन्यात भारतीय फॅन्सचा अफगाणिस्तानला पाठिंबा

भारतीय क्रिकेट चाहते सध्या अफगाणिस्तानच्या विजयासाठी प्रार्थन करत आहेत, आता तुम्ही म्हणाल भारतीय क्रिकेटरसिक असं का बरं करत असतील? याला कारणही विशेष आहे, भारतीय चाहते अफगाणिस्तानला पाठिंबा देत आहेत कारण, टी-20 विश्वचषकातील भारताच्या सेमीफायनलचं तिकीट अफगाणिस्तानच्या हातात आहे.

तेरी जित मेरी जित, तेरी हार मेरी हार... NZ vs AFG सामन्यात भारतीय फॅन्सचा अफगाणिस्तानला पाठिंबा
Indians fans
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 1:59 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहते सध्या अफगाणिस्तानच्या विजयासाठी प्रार्थन करत आहेत, आता तुम्ही म्हणाल भारतीय क्रिकेटरसिक असं का बरं करत असतील? याला कारणही विशेष आहे, भारतीय चाहते अफगाणिस्तानला पाठिंबा देत आहेत कारण, टी-20 विश्वचषकातील भारताच्या सेमीफायनलचं तिकीट अफगाणिस्तानच्या हातात आहे. रविवारी होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करणे गरजेजे आहे. अफगाणिस्तानच्या विजयात भारताचा विजय आणि पराभवात भारताचा पराभव अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामुळेच 7 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी जेव्हा अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडसमोर खेळत असेल तेव्हा संपूर्ण भारत त्यांच्या पाठिशी असेल. (T20 World Cup 2021, NZ vs AFG, Indians fans supporting afghanistan)

अफगाणिस्तानसाठी भारतीय चाहत्यांच्या पाठिंब्याचं सोशल मीडियावर मोठं पेव फुटलं आहे. विविध प्रकारचे मीम्स बनवले जात आहेत. कुणी भारत-अफगाणिस्तान मैत्रीची तुलना शोलेच्या जय आणि वीरूसोबत करत आहे, तर कोणी अफगाणिस्तानच्या समर्थकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे सांगत आहे. अनेकांनी अफगाणिस्तानच्या खेळाडूंना स्वतःच्या कव्हर फोटो आणि डीपीमध्ये जागा दिली आहे. हे सगळं घडत आहे कारण रविवारी जर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले तर भारत टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा प्रबळ दावेदार होईल.

भारताचं सेमीफायनलचं तिकीट अफगाणिस्तानच्या हातात

टी-20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) मधील उपांत्य फेरीच्या तिकिटासाठी, टीम इंडियाच्या हातात सध्या जे काही होतं ते त्यांनी केलं आहे. पण, आता अफगाणिस्तान संघ न्यूझीलंडचा पराभव करेल तेव्हाच पुढील वाटचाल यशस्वी होईल. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना 7 नोव्हेंबरला होणार आहे. भारताच्या हितासाठी या सामन्यात अफगाणिस्तानला विजय मिळवणे आवश्यक आहे. या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला तर भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांचं सेमीफायनलचं आव्हान संपुष्टात येईल.

इतर बातम्या

T20 World Cup: स्कॉटलंडवर मोठा विजय तर मिळवला, पण भारताचं सेमीफायनलमध्ये पोहचणं अजूनही अवघड, असं आहे गणित

T20 World Cup: स्कॉटलंडविरुद्ध बुमराहने रचला इतिहास, विश्वविक्रम नावे करत बनला भारताचा ‘विकेट वीर’

T20 world cup 2021: भारताविरुद्ध अफगाणिस्तान पराभूत, पण सामन्यात मिळाला बुमराहसारखा गोलंदाज, पाहा VIDEO

(T20 World Cup 2021, NZ vs AFG, Indians fans supporting afghanistan)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.