T20 world cup 2021: भारताविरुद्ध अफगाणिस्तान पराभूत, पण सामन्यात मिळाला बुमराहसारखा गोलंदाज, पाहा VIDEO

यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यात ज्याप्रमाणे दारुण पराभव स्वीकारला. त्याउलट अफगाणिस्तानविरुद्ध दमदार असा विजय मिळवत एक उत्तम पुनरागमन केलं.

T20 world cup 2021: भारताविरुद्ध अफगाणिस्तान पराभूत, पण सामन्यात मिळाला बुमराहसारखा गोलंदाज, पाहा VIDEO
बुमराह आणि नवीन
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 9:51 PM

T20 Cricket World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team)  विश्वचषकातील (T20 World Cup) पहिले दोन सामने गमावल्यानंतकर तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं. भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) सामन्यात भारताने उत्तम विजय मिळवला. या सामन्यात भारताने 210 धावांचां डोंगर उभा करुन अफगाणिस्तानला 144 धावांवर रोखत 66 धावांनी विजय मिळवला. सामन्यात अफगाणिस्तानला पराभव स्वीकारावा लागला असला तरी एक आनंदाची गोष्ट त्यांच्यासाठी घडली.

सामन्यात अफगाणिस्तान संघातून नवीन उल हक याने आपला पहिला सामना खेळला. विशेष गोष्ट म्हणजे या वेगवान गोलंदाजाची अॅक्शन अगदी भारतीय स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहसारखी आहे. तुम्हाला पटत नसेल तर आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन नवीन आणि बुमराह यांची गोलंदाजी दाखवणारा व्हिडीओही पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

नवीनला सरावाची गरज

नवीन याची अॅक्शन बुमराहसारखी असली तरी त्याला गोलंदाजीमध्ये खूप सरावाची गरज आहे. कारण भारताविरुद्धही त्याने 4 षटकात 59 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही.  आतापर्यंत नवीनने 12 टी20 आणि 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 14, तर टी20 मध्ये 18 विकेट्स आहेत.

भारत वि. अफगाणिस्तान लेखाजोखा

सामन्यात नाणेफेक जिंकत अफगाणिस्तान संघाने इतर बहुतांश संघ यंदाच्या विश्वचषकात निवडत असल्याप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा भारतीय सलामीवीरांना चूकीचा ठरवत धडाकेबाज फलंदाजी केली. केएल राहुल आणि रोहित शर्मा जोडीने सलामीला येत तब्बल 140 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित पाठोपाठ राहुलही बाद झाला. रोहितने 47 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकार ठोकत 74 धावा केल्या. तर राहुलने 48 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकार ठोकत 69 धावा केल्या. दोघेही बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या पंत आणि पंड्या यांनीही आक्रमक फलंदाजी केली. पंड्याने नाबाद 35 आणि पंतने नाबाद 27 धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने 210 धावा केल्या.

211 धावांचं मोठं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवातच खराब झाली. पहिली सर्व फलंदाजाची फळी पटपट बाद होत गेली. पण कर्णधार मोहम्मद नबी आणि करीम जनत यांनी एक चांगली भागिदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नबीने 35 धावा केल्या. तर जनत याने नाबाद 42 धावा केल्या. पण भारताचं 211 धावांचं मोठं लक्ष्य अफगाणिस्तान गाठू शकलं नाही. ज्यामुळे भारताचा 66 धावांनी विजय झाला. भारताकडून सर्वाधिक विकेट्स शमीने घेतल्या. त्याने 3 गड्यांना बाद केलं. तर आश्विनने 2, बुमराह आणि जाडेजाने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

हे ही वाचा :

मोठी बातमी: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती

Diwali Celebration: मास्टर-ब्लास्टरची मुलगी साराचा फेस्टीव्ह लूक पाहिलात का?, काळ्या रंगाच्या ड्रेसमधील हे PHOTO पाहाच!

T20 World Cup 2021: आधी सामन्यात पराभूत केल्यानंतर आता विराटच्या मोठ्या रेकॉर्डलाही बाबरची गवासणी, नामिबियाविरुद्ध विक्रमाची नोंद

(Afghanistan bowler Naveen ul haq bowling action is same like Jasprit bumrah)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.