T20 World Cup 2021: आधी सामन्यात पराभूत केल्यानंतर आता विराटच्या मोठ्या रेकॉर्डलाही बाबरची गवासणी, नामिबियाविरुद्ध विक्रमाची नोंद

सध्या जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणून विराटकडे पाहिलं जातं. पण सोबतच पाकिस्तानचा कर्णधार बाबरचंही नाव घेतलं जात असून त्याने नावाला साजेशी एक कामगिरी केली आहे.

1/4
मागील काही काळापासून विराटच्या बॅटमधून अधिक धावा येत नसल्याचं दिसून येत आहे. शतक ठोकूनही त्याला 2 वर्ष झाली आहेत. या सर्वाचाच फायदा घेत 
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याने विराटचा आणखी एक रेकॉर्ड तोडला आहे. आधी विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताला मात दिल्यानंतर बाबरने विराटला आणखी एक धक्का दिला आहे.
मागील काही काळापासून विराटच्या बॅटमधून अधिक धावा येत नसल्याचं दिसून येत आहे. शतक ठोकूनही त्याला 2 वर्ष झाली आहेत. या सर्वाचाच फायदा घेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याने विराटचा आणखी एक रेकॉर्ड तोडला आहे. आधी विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताला मात दिल्यानंतर बाबरने विराटला आणखी एक धक्का दिला आहे.
2/4
टी20 क्रिकेटमध्ये एक कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा 50 हून अधिक धावा करण्याचा मान बाबारने पटकावला आहे. त्याने विराटला मागे टाकत हा मान मिळवला आहे. बाबरने नामीबियाविरुद्ध 70 धावा करत अप्रतिम अर्धशतक झळकावलं. यासोबत त्याने कर्णधार म्हणून 14 व्या वेळेस आंतरराष्ट्रीय टी20  सामन्यात 50 हून अधिकचा स्कोर केला आहे.

3/4
बाबरने विराटला मागे टाकत ही कामगिरी केली आहे.  विराटने कर्णधार म्हणून 13 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 50 हून अधिक धावा लगावल्या आहेत.
बाबरने विराटला मागे टाकत ही कामगिरी केली आहे. विराटने कर्णधार म्हणून 13 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 50 हून अधिक धावा लगावल्या आहेत.
4/4
यामध्ये बाबर आणि विराट नंतर नंबर लागतो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरॉन फिंचचा. त्याने 11 वेळा 50 हून अधिक धावा केल्या असून त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसननेही 11 वेळा ही कामगिरी केली आहे.
यामध्ये बाबर आणि विराट नंतर नंबर लागतो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरॉन फिंचचा. त्याने 11 वेळा 50 हून अधिक धावा केल्या असून त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसननेही 11 वेळा ही कामगिरी केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI