AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: हार्दिक पंड्याचा खेळ खल्लास, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात डच्चू? दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याचा विचार

हार्दीकला संघात स्थान देण्यासाठी संघ व्यवस्थापनाने अनेक बदल केले. त्याच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजीपासून विश्रांती देत केवळ फलंदाजी करण्याची मुभा दिली. पण त्यातही तो फेल ठरल्याने आता सर्वचजण त्याच्यावर नाखूश आहेत.

T20 World Cup 2021: हार्दिक पंड्याचा खेळ खल्लास, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात डच्चू? दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याचा विचार
Hardik-Pandya
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 11:56 AM
Share

दुबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला दारुण पराभूत केलं. अगदी एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताचा 10 विकेट्सनी पराभव झाला. ज्यामध्ये पाकिस्तानने आधी उत्तम गोलंदाजी आणि नंतर क्लासिक फलंदाजी करत विजय मिळवला. या पराभवानंतर सर्व भारतीय क्रिकेटप्रेमी कमालीचे निराश झाले आहेत. सोशल मीडियावर तर नुसती टीकांची झुंबड उडाली आहे. विश्वचषकातील सामन्यात पराभव तेही पाकिस्तानकडून आणि तोही दारुण. या साऱ्यामुळे भारतीय खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावेळी संघ व्यवस्थापनाने अनेक संधी दिल्यानंतरही नापास ठरलेला खेळाडू हार्दीक पंड्यावर (Hardik Pandya) विशेष टीका होत आहेत. (T20 World Cup 2021 : Virat Kohli, Ravi Shastri likely to drop Hardik Pandya from IND vs NZ match)

हार्दीकला संघात स्थान देण्यासाठी संघ व्यवस्थापनाने अनेक बदल केले. त्याच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजीपासून विश्रांती देत केवळ फलंदाजी करण्याची मुभा दिली. पण त्यातही तो फेल ठरल्याने आता सर्वचजण त्याच्यावर नाखूश आहेत. केवळ फलंदाज म्हणून हार्दिकला संघात स्थान देण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनेदेखील त्याला केवळ फलंदाज म्हणून संघात ठेवलं होतं, मात्र तेव्हादेखील तो काही कमाल करु शकला नाही, तर त्याची हाराकिरी अजूनही सुरुच आहे. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री पंड्याला प्लेईंग इलेव्हनमधून डच्चू देण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. विराट आणि शास्त्रींसमोर सध्या दोन प्रश्न आहेत. केवळ फलंदाज म्हणून पांड्याला संघात खेळवण्याचा काय उपयोग? दुसरा प्रश्न म्हणजे शार्दुल ठाकूरला संघात समाविष्ट करून सहाव्या गोलंदाजाचा पर्याय का शोधू नये?

शार्दुलला संधी मिळण्याची शक्यता

शार्दुल ठाकूर टीम इंडियाच्या सध्याच्या मागणीनुसार परफेक्ट खेळाडू आहे, भारताला सहाव्या क्रमांकावर एका फलंदाजाची गरज आहे जो अखेरच्या षटकात वेगाने धावा जमवू शकेल. तसेच गोलंदाजीत सहावा पर्यायदेखील असेल. शार्दुल ठाकूर या अपेक्षांवर खरा उतरताना दिसत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर शार्दुल आयपीएल 2021 मध्येही चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. हार्दिकचा फलंदाजीचा फॉर्म आयपीएल 2021 मध्येही धुळीला मिळत होता, जिथे 12 सामने खेळल्यानंतर त्याच्या बॅटमधून 14.11 च्या खराब सरासरीने केवळ 121 धावा निघाल्या. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात, विराट कोहली आणि रवी शास्त्री हार्दिक पंड्याच्या जागी शार्दुल ठाकूरला खेळवण्याचा मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी अपेक्षा आहे.

पंड्याच्या कामगिरीवर विनोद कांबळी नाराज

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने (Vinod Kambli) कू या सोशल मीडिया साईटवर हार्दिकबद्दलची निराशा व्यक्त करत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्याने हार्दीकवर खास टीका करत त्याला थेट दांडीया खेळायचा खोचक सल्ला दिला आहे. काबंळीने कू अॅपवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे की, “मी कालच्या पराभवानंतर मी अतिशय दु:खी आहे. पाकिस्तानने अगदी ‘ओम भट्ट स्वाहा’ अशी भारताची अवस्था झाली. मनात खूप प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामध्ये काल काय झाले? नेमकी चूक कुठे झाली? यात मुख्य गुन्हेगार कोण आहे? असे प्रश्न आहेत. तर हार्दीकला मी एवढच सांगेन दुखापत असतानाही तू खेळतो आहेस. अशामध्ये मी एवढच सांगेन पांड्या तू जाऊन खेळ दांडीया”

इतर बातम्या

India vs Pakistan : भारतावर विजयानंतर बाबर आजमनं संघाला दिला मोलाचा संदेश, म्हणतो ‘अतिउत्साही होऊ नका, अजून स्पर्धा बाकी आहे’

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ

India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल

(T20 World Cup 2021 : Virat Kohli, Ravi Shastri likely to drop Hardik Pandya from IND vs NZ match)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.