T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला दारुण पराभूत केलं. अगदी एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताचा 10 विकेट्सनी पराभव झाला. ज्यामध्ये पाकिस्तानने आधी उत्तम गोलंदाजी आणि नंतर क्लासिक फलंदाजी करत विजय मिळवला. या पराभवानंतर सर्व भारतीय क्रिकेटप्रेमी कमालीचे निराश झाले आहेत. सोशल मीडियावर तर नुसती टीकांची झुंबड उडाली आहे. विश्वचषकातील सामन्यात पराभव तेही पाकिस्तानकडून आणि तोही दारुण. या साऱ्यामुळे भारतीय खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावेळी संघ व्यवस्थापनाने अनेक संधी दिल्यानंतरही नापास ठरलेला खेळाडू हार्दीक पंड्यावर (Hardik Pandya) विशेष टीका होत आहेत.