India vs Pakistan T20 World Cup VIDEO | रोहित शर्माच्या खेळीवरुन पत्रकाराचा खोचक प्रश्न, विराटने आधी रोखून पाहिलं, मग मान खाली घालून हसत सुटला

इशान किशनचा (Ishan Kishan) फॉर्म पाहता रोहित शर्माऐवजी त्याला संधी मिळायला पाहिजे का? असा प्रश्न एका पत्रकाराने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला विचारला. यावर विराट विस्मयचकित होऊन पत्रकाराकडे पाहू लागला

India vs Pakistan T20 World Cup VIDEO | रोहित शर्माच्या खेळीवरुन पत्रकाराचा खोचक प्रश्न, विराटने आधी रोखून पाहिलं, मग मान खाली घालून हसत सुटला
पत्रकाराच्या प्रश्नावर कोहली हसत सुटला

T20 World Cup 2021 : टी20 विश्वचषकात (T20 World Cup) पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने 10 विकेट्स राखून भारतावर (Ind Vs Pak) दमदार विजय मिळवला. सुमार सुरुवात आणि ढेपाळलेल्या फलंदाजीमुळे टीम इंडियाचा पराभव सुरुवातीपासूनच वर्तवला जात होता. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (K L Rahul) सपशेल फेल ठरल्यामुळे हिटमॅनच्या कामगिरीवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

पत्रकाराने काय विचारलं?

अशातच इशान किशनचा (Ishan Kishan) फॉर्म पाहता रोहित शर्माऐवजी त्याला संधी मिळायला पाहिजे का? असा प्रश्न एका पत्रकाराने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला विचारला. यावर विराट विस्मयचकित होऊन पत्रकाराकडे पाहू लागला. “हा अत्यंत धाडसी प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं सर? मला वाटतं की टीम उत्तम खेळली, तुमचं मत काय? तुम्ही रोहितला T20 संघातून बाहेर काढणार? तुम्हाला माहित आहे ना मागच्या सामन्यात त्याने काय केलं? माझा विश्वासच बसत नाही” असं उत्तर देत विराट मान खाली घालून हसायला लागला.

पाहा व्हिडीओ :

भारताची अत्यंत सुमार फलंदाजी

सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

पाकिस्तानचा दमदार विजय

152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.

हे ही वाचा :

पाकिस्तानचा आफ्रिदी भारताला खतरनाक नडला, दोन्ही सलामीवीरांना घातक ठरला, रोहित पायचित, तर राहुलचा त्रिफळा

एकामागेएक सलामीवर माघारी परतले, सुरुवात गंडली, पण विराट लढला, एकेरी कमान सांभळत पाकिस्तानच्या गोलंदाजांना भिडला

रोहित भाईची फलंदाजी पाहून घाबरलो, गोलंदाजी करण्याची हिंमत होत नव्हती; स्टार पाकिस्तानी गोलंदाजाची कबूली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI