T20 World Cup: टीम इंडियात मोठा उलटफेर, या दिग्गज खेळाडूला डच्चू? प्लेईंग 11 मध्ये बदल का?

Team India Playing 11: टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा जोरदार घोडदौड सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघ सुपर-8 मध्ये दाखल झाला आहे. विश्वचषक खिशात घालण्यासाठी संघात मोठा फेरबदल करण्याची शक्यता आहे. या दिग्गज खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

T20 World Cup: टीम इंडियात मोठा उलटफेर, या दिग्गज खेळाडूला डच्चू? प्लेईंग 11 मध्ये बदल का?
या बड्या खेळाडूला डच्चू?
Image Credit source: Google
| Updated on: Feb 20, 2026 | 4:07 PM

T20 World Cup Team India Playing 11: अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) टी20 विश्वचषक 2026 च्या सामन्यात चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. तो या विश्वचषकात सरस ठरलेला नाही. सलामीला उतरत असलेला हा दमदार खेळाडू गेल्या तीन सामन्यात एक धावही न काढता तंबूत परतला आहे. एकीकडे कर्णधाराला सूर गवसत नसतानच आघाडीचा खेळाडू सुद्धा तीच चूक करत असल्याने विश्वचषकावर नाव कोरण्याची स्वप्न पाहणाऱ्या व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे सुपर-8 मध्ये अभिषेक शर्मा याला काही सामन्यांसाठी थांबवल्या जाऊ शकते का असा सवाल विचारल्या जात आहे. तशी चर्चा पण सोशल मीडियावर रंगली आहे.

अभिषेकऐवजी संजू सॅमसनला मोठी संधी

भारताकडे अभिषेक शर्मा याला संजू सॅमसनचा मोठा पर्याय उपलब्ध आहे. संजू सॅमसनला टूर्नामेंटमध्ये एक संधी मिळालेली आहे. पण त्यात त्याला चमक दाखवता आली नाही. पण सॅमसन हा अभिषेकपेक्षा उजवा मानल्या जात आहे. कठीण वेळी तो चमत्कार घडवू शकतो असं चाहत्यांना वाटतं. अभिषेक शर्मा तर तीन सामन्यात भोपळाही फोडू शकलेला नाही. एकही धाव न करता तो तंबूत परतला आहे. तर संजू सॅमसन हा नामिबिया संघाविरोधात मैदानात उतरला होता. त्यावेळी संजू 22 धावा काढून बाद झाला होता. त्यामुळे सूर्यकुमार यादव याच्या प्लेईंग 11 मध्ये बदल करण्यासाठी एक संधी संजूच्या रुपात आहे. अर्थात संजूच्या कामगिरीवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही. पण चमत्कार घडू शकतो, एका सामन्यात हा बदल करू पाहण्यास हरकत नसल्याचे चाहत्यांचे मत आहे.

अभिषेकऐवजी संजूचा पर्याय?

तर एका अंदाजानुसार, दक्षिण आफ्रिकेविरोधात सुपर-8 मध्ये मोठा उलटफेर दिसू शकतो. भारतीय संघात अभिषेक शर्मा याला एका सामन्यासाठी विश्रांती देत संजू सॅमसन याला संधी देण्यात येऊ शकते. प्लेईंग 11 मध्ये बदल केल्या जाऊ शकतो. हा बदल प्रयोग म्हणून या सामन्यापुरता असू शकतो. अर्थात याविषयीची अधिकृत कोणतीही घोषणा टीम इंडियाने अद्याप केलेली नाही. पण खेळाडूंची खराब कामगिरी ही टीम इंडिया व्यवस्थापनासमोरील मोठी चिंता असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संजू सॅमसन याला दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात एक संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताचा सामना 22 फेब्रुवारी, रविवार रोजी होईल. हा सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरोधातील संभाव्य प्लेईंग 11

ईशान किशन(यष्टीरक्षक), संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकु सिंह, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह