AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप खेळलेला आणि विक्रम रचलेला खेळाडू अडकला दरोड्याच्या गुन्ह्यात, झालं असं की…

टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळलेला खेळाडू दरोड्याच्या गुन्ह्यात अडकल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. पापुआ न्यू गिनीचा खेळाडू दरोड्याच्या प्रकरणात अडकला आहे. न्यायालयाने त्याच्यावरील आरोप निश्चित केले आहेत. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

टी20 वर्ल्डकप खेळलेला आणि विक्रम रचलेला खेळाडू अडकला दरोड्याच्या गुन्ह्यात, झालं असं की...
दोनदा टी20 वर्ल्डकप खेळलेला आणि विक्रम रचलेला खेळाडू अडकला दरोड्याच्या गुन्ह्यात, झालं असं की...Image Credit source: Darrian Traynor-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Aug 29, 2025 | 5:29 PM
Share

पापुआ न्यू गिनीच्या एका खेळाडूवर दरोड्याचा गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. या खेळाडूचं नाव आहे किपलिंग डोरिगा.. हा खेळाडू पापुआ न्यू गिनीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. दोन टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने भाग घेतला आहेत. तसेच वर्ल्ड रेकॉर्डही नावावर आहे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या या खेळाडूच्या नावावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. किपलिंग डोरिगा याच्यावर जर्सीच्या कॅपिटल सेंट हेलियर्समध्ये झालेल्या एका घटनेत दरोड्याचा आरोप आहे. रिपोर्टनुसार, किपलिंग डोरिगाने न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सेंट हेलियर्समध्ये दरोड्याचा गुन्हा 25 ऑगस्टच्या सकाळी घडला होता. किपलिंगवरील आरोप खूपच गंभीर असल्याने हे प्रकरण न्यायालयाने रॉयल कोर्टात वर्ग केलं आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे. डोरिगाचा जामीन अर्ज फेटाळला असून त्याला या तारखेपर्यंत ताब्यात ठेवलं जाणार आहे. पापुआ न्यू गिनी संघ क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेट चॅलेंज लीगसाठी गेला होता. किपलिंग डोरिगा देखील या संघासोबत गेला होता.

किपलिंग डोरिकाने 2017 मध्ये पापुआ न्यू गिनीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. किपलिंग डोरिगाने 2017 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. किपलिंग डोरिगा हा एक विकेटकीपर फलंदाज आहे. त्याने पापुआ न्यू गिनीसाठी अनेक महत्त्वाचे सामने खेळले आहेत. दरम्यान वानुआतुविरुद्ध खेळताना त्याने एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने एकाच सामन्यात पाच झेल घेण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे डोरिगा सध्या खेळल्या जाणाऱ्या सीडब्ल्यूसी चॅलेंज लीगच्या दुसऱ्या फेरीत पापुआ न्यू गिनी संघाचा भाग आहे.

किपलिंग डोरिगाने 39 वनडे सामन्यातील 38 डावात 20.27 च्या सरासरीने 730 धावा केल्या आहेत. यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 43 टी20 सामन्यात 12.37 च्या सरासरीने 359 धावा केल्या आहेत. यात नाबाद 46 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. डोरिगा 2021 आणि 2024 मध्ये दोनदा आयसीसी टी20 विश्वचषक खेळला आहे. 2021 च्या पर्वात त्याने तीन सामन्यांमध्ये 64 धावा केल्या तर 2024 च्या पर्वात त्याने चार सामन्यांमध्ये 71 धावा केल्या आहेत.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…