AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup Final live streaming: टी20 विश्वचषकाचा महामुकाबला, ऑस्ट्रेलियासमोर न्यूझीलंडचा संघ, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना

T20 World Cup: विश्वचषकातील पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंड संघाने इंग्लंडला मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली ज्यानंतर पाकिस्तानला मात देत ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता हे दोघे एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत.

T20 World Cup Final live streaming: टी20 विश्वचषकाचा महामुकाबला, ऑस्ट्रेलियासमोर न्यूझीलंडचा संघ, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 13, 2021 | 8:15 AM
Share

दुबई:  यंदाचा टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) आता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. उद्या अर्थात शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. संपूर्ण विश्वचषकात उत्तम कामगिरी करत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (New Zealand vs Australia) हे संघ फायनलपर्यंत पोहोचले आहेत. पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंड संघाने इंग्लंडला मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली ज्यानंतर पाकिस्तानला मात देत ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता हे दोघे एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत. वेगवेगळ्या ग्रुपमधून आलेले हे संघ यंदाच्या विश्वचषकात प्रथमच आमने-सामने येणार असून कोण यंदाची ट्रॉफी उचलेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनलचा सामना कधी खेळवला जाईल?

टी – 20 विश्वचषकातील अंतिम सामना उद्या अर्थात रविवारी (14 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल. नाणेफेक 7 वाजता होणार आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा टी -20 विश्वचषकाचा अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे होईल?

विश्वचषकाचा अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केला जाईल.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्‍ट्रीमिंग कोठे होईल?

या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्‍ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता

सामन्यासाठी संभाव्य संघ

संभाव्य न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), डॅरील मिचेल, मार्टीन गप्टील, जेम्स निशम, डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने.

संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, आरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वॅड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्च, अॅडम झाम्पा, जोश हॅजलवुड.

हे ही वाचा

Special Report: ‘विराटपर्व’ संपण्याच्या वाटेवर?

सानिया मिर्झाने पाकिस्तानला पाठिंबा देताच भारतीय नाराज, म्हणाले ‘पाकिस्तानातच जाऊन राहा…’

IND vs NZ : भारतीय कसोटी संघात नवा मुंबईकर, न्यूझीलंडविरुद्ध करणार पदार्पण

(T20 world cup final between New Zealand vs Australia live streaming when and where to watch online match)

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?