VIDEO: पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी भलत्याच गुर्मीत, LIVE मॅचदरम्यान भारतीय फलंदाजांची नकल करत उडवली खिल्ली

विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानने मात दिली. या पराभवानंतर भारतीय संघासह सर्वच चाहते कमालीचे निराश आहेत. आता मात्र पाकच्या शाहीन आफ्रिदीने भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे.

VIDEO: पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी भलत्याच गुर्मीत, LIVE मॅचदरम्यान भारतीय फलंदाजांची नकल करत उडवली खिल्ली
शाहीन आफ्रिदी (सौजन्य-ट्विटर)
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 10:57 PM

T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. सुरुवातीते दोन्ही सामने गमावल्यानंतर भारताला पुनरागमन करणं अवघड होतं. अशावेळी न्यूझीलंडने अप्रतिम कामगिरी करत पाकिस्तानसह पुढील फेरी गाठली आणि भारत स्पर्धेबाहेर झाला. त्यात भारताला स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून (India vs Pakistan) पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव भारताच्या अत्यंत जिव्हारी लागला असताना आता पाकच्या एका खेळाडूने भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे.

हा खेळाडू म्हणजे पाकचा 21 वर्षीय गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi). आफ्रिदीने भारताविरुद्ध्या सामन्यात महत्त्वाचे 3 विकेट्स घेतले. सर्वात आधी शून्य धावांवर खेळणाऱ्या रोहितला, पाठोपाठ 3 धावांवर खेळणाऱ्या केएल राहुलला आणि अखेर विराटला बाद करत महत्त्वाचे विकेट आफ्रिदीने टीपले. त्यानंतर आता शाहीनने एका विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या शाहीनला पाकिस्तानी फॅन्स विराट, रोहित कसे बाद झाले असं मिश्किलपणे विचारत आहेत. तेव्हा शाहीन नकल करत ते कसे बाद झाले हे दाखवत आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

कोण आहे शाहीन आफ्रिदी?

सध्या पाकिस्तान संघाच्या टेस्ट, वनडे आणि टी-20 अशा तिन्ही क्रिकेट प्रकारात एक उत्तम गोलंदाज असणारा शाहीन हा 21 वर्षाचा आहे. सात भावांमध्ये सर्वात छोटा असणारा शाहीन अगदी 4 वर्षाचा असल्यापासून क्रिकेट खेळतो आहे. त्याचा मोठा भाऊ रियाज आफ्रिदी याने त्याला क्रिकेट शिकवलं. रियाजने पाककडून 2004 साली एकमेव कसोटी सामना खेळला होता. दरम्यान शाहीनने 2015 साली अंडर16 संघातून ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. तेव्हापासून तो संघातून खेळत आहे. 2018 विश्वचषकातही तो अंडर19 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघात होता. यावेळी 5 सामन्यात त्याने 12 विकेट्स घेतल्या. आतापर्यंत 19 टेस्ट सामन्यात त्याने 76, 28 वनडेमध्ये 63 आणि 31 टी20 सामन्यात 35 विकेट्स घेतल्या आहेत.

इतर बातम्या

विराट कोहलीच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या देणारा ताब्यात, मुंबई पोलिसांची हैद्राबादमध्ये कारवाई, आरोपी आहे IIT पासआऊट

VIDEO: हार्दीकची पत्नी नताशाची समुद्रात मजा-मस्ती, इशान किशनसह श्रेयस अय्यरही जोडीला

T20 World Cup मधील प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने निवडली त्याची प्लेयिंग 11, बाबर आजम कर्णधार, रोहित-विराट बाहेर

(shaheen afridi makes fun of indian batsmans how they got out)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.