AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: हार्दीकची पत्नी नताशाची समुद्रात मजा-मस्ती, इशान किशनसह श्रेयस अय्यरही जोडीला

भारतीय संघाला खराब प्रदर्शनामुळे टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलआधीच स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. आता आगामी न्यूझीलंड मालिकेसाठी भारत सज्ज झाला असून संघ निवडही पूर्ण झाली आहे.

VIDEO: हार्दीकची पत्नी नताशाची समुद्रात मजा-मस्ती, इशान किशनसह श्रेयस अय्यरही जोडीला
नताशा स्टानकोविच
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 8:23 PM
Share

दुबई: यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियाने अत्यंत खराब प्रदर्शन केल्यामुळे त्यांना सेमीफायनलपूर्वीच स्पर्धेबाहेर जावं लागलं आहे. दरम्यान स्पर्धेत भारताचा स्टार अष्टपैैलू खेळाडू हार्दीक पंड्या (Hardik Pandya) याला अनेक संधी देण्यात आल्यानंतरही तो खास छाप सोडू शकला नाही. त्यामुळे स्पर्धेनंतर त्याची खराब वेळ सुरु झाली असून आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी हार्दीकला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. पण दुसरीकडे हार्दीकची पत्नी मात्र समुद्रात मजा-मस्ती करताना दिसून आली असून तिच्या सोबतीला भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर आणि इशान किशनही आहेत.

नताशा स्टानकोविच हिने बुधवारी एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. यामध्ये ती दुबईच्या समुद्रात जेट स्की चालवत मजा करताना दिसत आहे. या व्हिडीमध्येच भारतीय खेळाडू इशान किशन आणि श्रेयस अय्यर दोघेही जेट स्की चालवत असून ते मध्येच समुद्रात उड्या मारताना दिसत आहेत.

हार्दीकला संघात स्थान नाही

इकडे विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्व सामन्यांचे वेळापत्रकही नुकतेच जाहीर झाले असून आता सर्वात पहिल्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघही जाहीर केला आहे. यावेळी टी20 संघाचं कर्णधारपद रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे सोपवण्यात आलं. अनेक दिग्गज खेळाडू विश्रांतीकरीता संघाबाहेर आहेत पण हार्दीकने अधिक सामने खेळले नसतानाही त्याला बाहेर बसवण्यात आलं आहे.

असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

इतर बातम्या

विराट कोहलीच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या देणारा ताब्यात, मुंबई पोलिसांची हैद्राबादमध्ये कारवाई, आरोपी आहे IIT पासआऊट

VIDEO: मूर्ती लहान पण किर्ती महान, केवाय वेंकटेश यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती उतरले मंचावरुन खाली

T20 World Cup मधील प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने निवडली त्याची प्लेयिंग 11, बाबर आजम कर्णधार, रोहित-विराट बाहेर

(Hardik Pandya wife natasa stankovic posts jetski Fun Video Ishan kishan and shreyas iyer is in video)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.